गडचिरोली शहरात तंबाखू विक्रेत्यांवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 05:00 AM2020-04-29T05:00:00+5:302020-04-29T05:00:48+5:30

शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढे कोणत्याही स्वरूपाचा तंबाखू, उत्पादनाचे साधन, खर्रा मशीन आढळल्यास कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशीही सूचना या तपासणी दरम्यान दुकानदारांना देण्यात आली.

Raid on tobacco sellers in Gadchiroli city | गडचिरोली शहरात तंबाखू विक्रेत्यांवर धाडसत्र

गडचिरोली शहरात तंबाखू विक्रेत्यांवर धाडसत्र

googlenewsNext
ठळक मुद्देएक मशीन जप्त : पालिका, पोलीस व मुक्तिपथची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शहरातील तीन ते चार किराणा दुकाने व एका पानठेलाधारकाच्या घरी मंगळवारी धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, नगर परिषद, पोलीस विभाग व मुक्तिपथने संयुक्तपणे कारवाई केली. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अंतर्गत कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्री होऊ नये, या हेतूने सदर कारवाई करण्यात आली.
शहरातील किराणा दुकानांतून खर्रा व इतरही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये, यासाठी मंगळवारी प्रशासन व मुक्तिपथच्या चमूने शहरातील चार दुकानांची झडती घेतली. यावेळी लपवून ठेवलेला तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापुढे कोणत्याही स्वरूपाचा तंबाखू, उत्पादनाचे साधन, खर्रा मशीन आढळल्यास कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशीही सूचना या तपासणी दरम्यान दुकानदारांना देण्यात आली. रेड्डी गोडावून परिसरातील एका पानठेलाधारकाच्या घरी दुकानातील खर्रा बनविण्याची मशीन सापडली. ती जप्त करून पाच हजार रुपये दंड ठोठावला. याशिवाय आरमोरी मार्गावरील एका किराणा दुकानात धाड टाकून तंबाखू जप्त करण्यात आला. तसेच एका पान मटेरिअलच्या दुकानात धाड टाकली असता, येथेही तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा प्रमुख डॉ. नंदू मेश्राम, नगर परिषदेच्या कोविड -१९ भरारी पथकातील अखिल चव्हाण, न. प. चे प्रभारी अधीक्षक एस. पी. भरडकर, पोलीस विभागाचे बेसरकर, रायपुरे, मुक्तिपथ संचालक डॉ. मयूर गुप्ता आणि उपसंचालक संतोष सावळकर, अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम यांच्या पथकाने केली आहे.

आठ किराणा दुकानांमधून तंबाखू जप्त
आरमोरी : लॉकडाऊनचा फायदा घेत किराणा दुकानांमधून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आरमोरी शहरातील आठ दुकानांवर सोमवारी छापे टाकण्यात आले. यावेळी तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. तहसील कार्यालय व मुक्तिपथने संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. किराणा दुकाने अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने विशिष्ट कलावधिकारिता ती उघडण्याची परवानगी आहे. पण ही संधी साधून किराणा दुकानदार तंबाखूजन्य पदार्थाची साठेबाजी व विक्री करीत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे तहसील कार्यालयातील कर्मचारी व मुक्तिपथने मिळून सोमवारी शहरातील आठ किराणा स्टोअर्समध्ये छापे टाकले असता मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य साहित्य सापडले. यामध्ये जाफराणी जर्दा, खर्रा पन्नी, नस, गुडाखू यासह इतरही तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे.हा सर्व मुद्देमाल तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. याप्रकरणी आठही दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नायब तहसीलदार वाय.डी.चाफले, तलाठी पी.बी.गजभिये, कोतवाल योगेश कुमरे आणि मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Raid on tobacco sellers in Gadchiroli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.