वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:30 PM2019-08-25T23:30:50+5:302019-08-25T23:34:44+5:30

यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते.

Rain 82% of the annual average | वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

वार्षिक सरासरीच्या ८२ टक्के पाऊस झाला

Next
ठळक मुद्देमहिनाभरापासून संततधार : सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वसाधारणपणे १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २५ ऑगस्टपर्यंत १०९२.८ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८०.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचे सहा दिवस व पूर्ण सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अपवाद वगळता ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक दिवशी पाऊस झाला. या महिन्यात तब्बल ५३२.७ मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत सुमारे १५२ टक्के पाऊस झाला आहे.
यावर्षी सुरूवातीला पावसाने चांगलाच दगा दिला. बरेच दिवस पाऊस न झाल्याने पेरणीची कामे थांबली होती. पावसाला सुरूवात झाल्यानंतर पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे पेरणीची कामे लांबली होती. काही शेतकऱ्यांचे कापूस पेरणी, धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम लांबले होते. जवळपास ८ ते १० दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली.
जुलै महिन्यातही चांगलाच पाऊस पडला. जून, जुलै महिन्यात ७०२.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ५६० मिमी पाऊस पडला होता. म्हणजेच सर्वसाधारणच्या तुलनेत २० टक्के पाऊस कमी झाला. मात्र ही कसर ऑगस्ट महिन्यातील पावसाने भरून काढली.
आॅगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला. प्रत्येक दिवशी पाऊस येत आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण ३५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. यावर्षी मात्र या महिन्यात ५३२.७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यावर्षी सुमारे १५१.८ मिमी पाऊस पडला आहे.

ऑगस्टमध्ये ५३३ मिमी पाऊस
ऑगस्ट महिन्यात अपवाद वगळता प्रत्येक दिवशी पाऊस झाला. १ ते २५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हाभरातील ५३२.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वसाधारपणे ५५१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. अपेक्षित पावसाच्या १५१.८ टक्के पाऊस झाला आहे.

सततच्या पावसाने नागरिक त्रस्त
ऑगस्ट महिन्याच्या अगदी सुरूवातीपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील तलाव अर्धेही भरले नसल्याची ओरड आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तलाव, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाचा परिणाम पिकांवर होत आहे. ऊन निघत नसल्याने धान पिकाची वाढ खुंटली आहे. तर कपाशी, सोयाबिन, तूर पिकांच्या शेतामध्ये पाणी साचली असल्याने या पिकांची तर वाट लागली आहे. या पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. मागील वर्षी सुध्दा कापसाचे उत्पादन झाले नव्हते. यावर्षी सुध्दा कापूस दगा देणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Web Title: Rain 82% of the annual average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस