अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:30 AM2019-08-18T00:30:08+5:302019-08-18T00:30:44+5:30

पाऊस अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. परंतु यंदा ंअवेळी झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने धान पीकाचे नुकसान झाले. परिणामी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळयात पाणी आणले आहे.

The rain brought water to the eyes of the farmers | अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । धानपीक सडले तर काही ठिकाणचे पीक पुराने झाले नष्ट; शेताला जलाशयाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : पाऊस अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. परंतु यंदा ंअवेळी झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने धान पीकाचे नुकसान झाले. परिणामी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळयात पाणी आणले आहे.
नुकत्याच गेलेल्या सोमवारच्या रात्री, मंगळवारी दिवसभर तसेच रात्रीही जोराचा पाऊस कोसळला. त्यामुळे गाढवी नदी, नाले, बोड्या, तलाव, शेतातील बांध्यांमध्ये पाणी होतेच. या आठवड्यात आलेल्या धोधो पावसाने जलसाठ्यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गाढवी नदीतील पाणी वाढल्याने नदीच्या काठालगतच्या शेतात नदीचे पाणी शिरले. गाढवी नदीचा जलस्तर वाढला की या नदीला येऊन भेटणारे एकलपूर-विसोरा, विसोरा-तुळशी, शंकरपुर-चोप, शंकरपुर-विठ्ठलगाव, पोटगाव-विहिरगाव या मार्गावरील सर्व लहान-मोठ्या नाल्यांचे पाणी स्थिर होते. पाणी स्थिर झाल्याने नाल्याचे पाणी नाल्याच्या चहुकडे पसरून जणू सरोवराचे रुपडे तयार झाले होते. त्यामुळे या सर्व नाल्यांच्या दोन्ही बाजूला असलेली शेती पाण्यात बुडाली. धानपीक पाण्यात बुडून राहिल्याने तसेच पाण्याच्या प्रवाहातील माती, रेती, दगड यांनी उभे धानपीक पार वाहून नेले तर काही शेतात पाणी प्रवाहात पाण्यासोबतचे गाळ, वाळू धानपिकावर पसरल्याने धानसह तुळशी, कोकडी, उसेगाव, शंकरपुर, कसारी भागातील धान वाफे करपले. उसेगाव येथील शेतकरी गोपाल बोरकर यांनी तर ट्रँक्टर ट्रॉलीत प्लास्टिक ताडपत्री टाकून त्यात पाणी भरून धान पºहे वाचविले. संततधार, मुसळधार, रिमझिम असा पाऊस शेतीसह शेतकरी आणि साऱ्यांना सुखावून गेला. जुलैच्या मध्यापर्यंत कोरडे पडलेले जलसाठे पाण्याने भरू लागले. पुनर्वसु नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे आधीच करपलेले धानपºहे पुष्य नक्षत्राच्या पाण्याने कसेबसे वाचले. रोवणी झाली आणि आता ही अतिवृष्टी झाल्याने धान सडून गेले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी आहे. विहिरगाव येथील शेतकरी दिनकर करंबे, नामदेव भुते, पांडुरंग पत्रे, मंसाराम दोनाडकर, गौतम शेंडे, मनोहर नाकतोडे, गोपीनाथ ठाकरे, दिवाकर दोनाडकर, विनायक गुरुनुले आदींचे धान पीक पुरात नष्ट झाले.

यंदा पाऊस विलंबाने पडला. आमची शेती वरच्या पावसावर अवलंबून असल्याने धान पेरणी उशीरा झाली. मागील महिन्यात सुरूवातीला पाऊस झाला नाही. त्यामुळे धान वाढले. त्यानंतर पाऊस झाला. धान पºहे वाचले. आता रोवणी झाल्यावर मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे धान पीक खराब झाले.सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे.
- प्रवीण दोनाडकर, शेतकरी, विहिरगाव

Web Title: The rain brought water to the eyes of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती