वाघ शाेधमाेहिमेत पावसाचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:37+5:302021-09-14T04:43:37+5:30
गडचिराेली : नागरिकांचे बळी घेणाऱ्या वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी वनविभागाने नागझिरा येथून स्पेशल टायगर प्राेटेक्शन फाेर्सच्या २४ कर्मचाऱ्यांची टीम गडचिराेली ...
गडचिराेली : नागरिकांचे बळी घेणाऱ्या वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी वनविभागाने नागझिरा येथून स्पेशल टायगर प्राेटेक्शन फाेर्सच्या २४ कर्मचाऱ्यांची टीम गडचिराेली येथे दाखल झाली आहे. दरदिवशी अर्मिझा परिसरात त्या वाघाचा शाेध घेतला जात आहे. मात्र, पाऊस सुरू असल्याने शाेधमाेहिमेत अडथळा येत असल्याची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
अर्मिझा परिसरात अनेक वाघ आहेत. ज्या वाघाला पकडण्याची परवानगी मिळाली आहे, नेमका ताेच वाघ पकडावा लागणार आहे. मात्र, पावसामुळे त्याचे पगमार्क मिटत असल्याने त्याला शाेधून काढणे कठीण जात आहे. तसेच पावसाचा त्रास शाेध घेणाऱ्या वनकर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. जंगलातून शाेध घेताना वनकर्मचाऱ्यांवर वाघाचा हल्ला हाेऊ नये यासाठी चारही बाजूंनी पिंजरा तयार केलेला ट्रॅक्टर वापरला जात आहे. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी दाेन शूटर, एक पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. मंगळवारपासून जंगलातून जेसीबीने वाघाचा शाेध घेतला जाणार आहे.