अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 05:00 AM2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:39+5:30
अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.
न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम/अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे गुड्डीगुडम भागातील मोसम व लगतच्या शेत जमिनीतील हलक्या प्रतिच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हलक्या प्रतिचा उभा धान आडवा पडल्याने जमिनदोस्त झाला आहे.
अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.
हलक्या प्रतिचा धान पीक दिवाळीपूर्वी भरला. दिवाळीनंतर या धान पिकाची कापणी व बांधणीचे काम होणार होते. काही शेतकºयांनी तशी कापणी केली आहे. मात्र दिवाळीच्या पूर्वी पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरासह अहेरी उपविभागात दमदार अवकाळी पाऊस बरसला. परिणामी हलक्या प्रतिचा धान पीक आडवा पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. परिणामी अहेरी उपविभागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.