पावसाची उसंत पुन्हा राेवणे थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:45+5:302021-08-23T04:39:45+5:30
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. काही भागात तर पुरेसा पाऊसच झाला नाही. काही शेतकऱ्यांचे राेवणे थांबले हाेते. काही जणांचे ...
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. काही भागात तर पुरेसा पाऊसच झाला नाही. काही शेतकऱ्यांचे राेवणे थांबले हाेते. काही जणांचे अर्धेच राेवणे झाले हाेते. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राेवणीच्या कामांना सुरुवात झाली हाेती. मात्र पुन्हा पावसाने उसंत घेतल्याने राेवणीची कामे थांबली आहेत.
धान राेवणीचा कालावधी आधीच निघून गेला आहे. आता जेवढा उशीर हाेईल तेवढी धानाच्या उत्पादनात घट हाेणार आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी धान राेवणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही जमीन पडीक राहणार आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला हाेता. मात्र हा अंदाज खाेटा ठरला आहे. गडचिराेली जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. तलाव, बाेड्या अजूनही अर्धेच भरले आहेत.