जिल्ह्यात १९५ मिमी पावसाची नोंद

By admin | Published: July 5, 2016 02:17 AM2016-07-05T02:17:48+5:302016-07-05T02:17:48+5:30

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात १९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

The rainfall of 1955 mm is recorded in the district | जिल्ह्यात १९५ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात १९५ मिमी पावसाची नोंद

Next

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात १९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेती कामांना आता वेग आला आहे. रात्री पाऊस व दिवसा उघडझाप असल्याने शेती काम दिवसा व्यवस्थितरित्या पार पाडली जात आहे.
गडचिरोली तालुक्यात २१.२, धानोरा २५, चामोर्शी ११.२, मुलचेरा २२.२, देसाईगंज २२, आरमोरी २४.४, कुरखेडा २५, कोरची ३०, अहेरी १, एटापल्ली ११.२, भामरागड तालुक्यात २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर सिरोंचा तालुक्यात पावसाची नोंद प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाने घेतलेली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १२५.१९ मिमी पाऊस झाल्याची नोंद नियंत्रण कक्षाने घेतली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे उघडल्याने जिल्ह्यातील बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहे. (प्रतिनिधी)

४गडचिरोली शहरात अनेक प्रभागात मोकळे प्लॉट मोठ्या प्रमाणावर आहेत. या प्लॉटच्या जागांमध्ये पावसाचे पाणी जमा होऊन आहे. येथून पाणी काढण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने या पाण्यामध्ये डासही निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी नाल्या तुंबून असल्याने पावसासह नालीतील सांडपाणी रस्त्यावर येत आहे.

Web Title: The rainfall of 1955 mm is recorded in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.