भामरागडसह जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:17 PM2017-10-01T23:17:14+5:302017-10-01T23:17:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात फारसा पाऊस झाला नाही. मात्र रविवारी सायंकाळी ४ वाजतापासून मेघगर्जनेसह भामरागड, धानोरा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
भामरागड शहरासह तालुक्यात पावसाच्या दमदार सरी बरसल्या. धानोरा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. गडचिरोली शहर व तालुक्यात सायंकाळच्या सुमारास पाऊस झाला. विशेष म्हणजे, यावेळी विजेचा कडकडाट व वादळ सुटले होते. दसºयानंतर रविवारला गडचिरोली, आरमोरी शहरासह अनेक ठिकाणी दुर्गा व शारदा विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. मात्र अचानक पाऊस झाल्याने भाविकांच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन झाले. २९ सप्टेंबरलाही गडचिरोली जिल्ह्यात एकूण १०.३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने घेतली आहे.
बाजारात उडाली तारांबळ
गडचिरोली शहराच्या आठवडी बाजारात रविवारला ग्राहकांची प्रचंड गर्दी होती. दरम्यान सायंकाळी ४.५० वाजताच्या सुमारास अचानक वादळी पाऊस झाला. त्यामुळे ग्राहकांचीही काही वेळ तारांबळ उडाली. पावसाचा अंदाज नसल्याने एकानेही छत्री आणली नव्हती. त्यामुळे शेडचा आडोसा घेतला.