गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे थैमान; संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:01 AM2020-08-21T11:01:32+5:302020-08-21T11:01:51+5:30
गेल्या २४ तासात गडचिरोली झालेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, चार तालुक्यात धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गेल्या २४ तासात गडचिरोली झालेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला असून, चार तालुक्यात धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्तीसगडकडून येणाऱ्या इंद्रावती व पामुलगौतम या नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीवरचा दाब वाढून पाणी गावांमध्ये शिरले आहे. कुरखेडा येथे सर्वात जास्त म्हणजे १२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ देसाईगंज ९० मिमी. कोरची ७६ मि.मी. व आरमोरी ६६ मिमी. अशी नोंद आहे. गावांचा जगाशी संपर्क तुटल्याने नागरी जीवन अस्तव्यस्त झाले आहे.