पावसाने पुन्हा झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:12 PM2019-08-05T23:12:14+5:302019-08-05T23:12:29+5:30
२७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २७ जुलैपासून २ आॅगस्टपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस बरसला. सदर कालावधीत पावसाने मुळीच विश्रांती घेतली नाही. दरम्यान आकाश मोकळे झाल्याने रविवारी पाऊस बरसला नाही. मात्र सोमवारी नागपंचमीच्या दिवशी पुन्हा गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सरी बरसल्या. या पावसाने गडचिरोली व आरमोरी शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली आहे. दुपारी ३ वाजतानंतर अचानक आकाशात ढग दाटून आले. त्यानंतर काही वेळातच गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे बाजारपेठेते विविध साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. भामरागड व आष्टी येथील नदी पुलावरील पूर सायंकाळच्या सुमारास ओसरला होता. त्यानंतर भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. आष्टी येथील वैनगंगा नदीचा पूर ओसरल्याने चंद्रपूर-आष्टी मार्गावरील वाहतूक पूर्वत सुरू झाली. मात्र सोमवारी पुन्हा पाऊस बरसल्याने पुलावर पाणी साचले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस होत असल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहेत. परिणामी अशा शेतातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहेत. रविवारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र पुन्हा सोमवारी पाऊस झाल्यामुळे रोवणी लांबणीवर पडण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले.