टसर रेशीम शेतीला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:38+5:302021-09-16T04:45:38+5:30

वैरागड : टसर अळ्यांचे संगोपन करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्जुन वृक्षाच्या कोवळ्या पानावर अंडीपुंज ठेवण्यात येतात. ...

Rains hit tusser silk farming | टसर रेशीम शेतीला पावसाचा फटका

टसर रेशीम शेतीला पावसाचा फटका

Next

वैरागड : टसर अळ्यांचे संगोपन करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अर्जुन वृक्षाच्या कोवळ्या पानावर अंडीपुंज ठेवण्यात येतात. त्या अंडीपूजपासून झाडावर केसाळ अळीची निर्मिती होते. रेशीम शेतीची ही अवस्था सुरू हाेती. मागील आठ ते दहा दिवसांपासून हाेत असलेल्या जोरदार पावसामुळे पहिल्या अवस्थेतील टसर अळ्या मरण पावल्याने टसर रेशीम शेतीला पावसाचा फटका बसला. परिणामी रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अंडीपुंज दुसऱ्यांदा खरेदी करावे लागले आहे.

आरमोरी तालुक्यातील नागरवाही, मेंढेबोडी, कुरखेडा तालुक्यातील कढाेली, जांबडी या गावात पारंपरिकरीत्या ढिवर समाज बांधव टसर रेशीम शेती करतात. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंडीपुंज आतून बाहेर आलेल्या रेशीम अळ्यांना येन, अंजनाच्या झाडावर कोवळ्या पानावर व्यवस्थित ठेवावे लागतात. त्यानंतर झाडाची व्यवस्थित निगा राखून काडीकचरा साफसफाई केल्यानंतर वयस्कर अळ्या कोश तयार करतात. या कोश तयार करण्याची सुरुवात झाली असतानाच वातावरण अनुकूल असावे लागते; पण रेशीम अळ्या पहिल्या अवस्थेत असताना पावसामुळे रेशीम अळ्या मृत्युमुखी पडल्याने रेशीम शेतीला फटका बसला आहे.

रेशीम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा अंडीपुंज खरेदी करून झाडांचे संगोपन करण्यास सुरुवात केली आहे. अंडीपुंज निर्मिती केंद्र आरमोरी येथे असून, या केंद्रातून उत्पादकांना सुविधा पुरविल्या जातात व नैसर्गिकरीत्या काही हानी झाल्यास सवलतीच्या दरात अन्न पुरवठा केला जातो, अशी माहिती शेतकरी पांडुरंग कांबळे यांनी दिली.

बॉक्स:

येन वृक्षाचे वनक्षेत्र घटले

पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यांत टसर शेती करणाऱ्या गावांची संख्या १६३ असून, अर्जुन या वृक्षांचे वनक्षेत्र १७७६६ हेक्टर होते. परंतु सतत होणारी वृक्षतोड आणि शेळी पालकांकडून अर्जुन वृक्षाची होणारी अनावश्यक कत्तल यामुळे आता या वृक्षाचे वनक्षेत्र निम्मेही राहिले नाही त्यामुळे टसर रेशीम शेती धोक्यात आली, असे टसर रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

150921\img_20201029_094800.jpg

फोटो.....टसर रेशीमड्याळ दाखवताना शेतकरी

Web Title: Rains hit tusser silk farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.