धान पट्टयात पावसाची हुलकावणी, शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:37+5:302021-08-02T04:13:37+5:30

तालुक्यातील काही भाग वगळता बहुतांशी शेती वरपाण्यावर अवलंबून आहे. मात्र, भर पावसाळ्यात शेतात अजूनही अपेक्षित पाणी साठा दिसून येत ...

Rains in paddy fields, farmers worried | धान पट्टयात पावसाची हुलकावणी, शेतकरी चिंतातूर

धान पट्टयात पावसाची हुलकावणी, शेतकरी चिंतातूर

Next

तालुक्यातील काही भाग वगळता बहुतांशी शेती वरपाण्यावर अवलंबून आहे. मात्र, भर पावसाळ्यात शेतात अजूनही अपेक्षित पाणी साठा दिसून येत नसल्याने रोवणी काम करण्यास शेतकऱ्यांना अडचण जात आहे . शेतकरी पावसाच्या उपलब्धतेनुसार हलक्या, मध्यम, जड धानाची लागवड करीत असतात. कालावधी उलटूनही अजूनही हलक्या धानाची रोवणी झाली नाही. त्यामुळे हलक्या धान पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

केवळ सखल भागात पाणी उपलब्धतेनुसार रोवणी काम केले जात आहे. अजूनही धानपट्ट्यात अपेक्षित पाऊस आला नाही. दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाच्या हुलकावणीचा सामना करावा लागत असतो. सध्या धान पऱ्हे वाढ अपेक्षेपेक्षा अधिक झाली आहे. काही शेतकरी धान पऱ्हे कोरडेच खोदून त्याची रोवणी करताना दिसून येत आहेत. रोवणीनंतर अपेक्षित पाणी भात खाचरात दिसून येत नसल्याने रोवणी केलेले पीक पाण्याअभावी पिवळसर पडत आहेत.

बाॅक्स :

आवत्या जाेमात, राेवणी काेमात

दरवर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान रोवणी काम केले जात असते. मात्र, यावर्षी पावसाच्या हुलकावणीचा अंदाज सुरुवातीला दिसून आल्याने मोठ्या प्रमाणात आवत्या पद्धतीने धान पीक लागवड क्षेत्र अधिक आहे. सध्या तालुक्यात ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात धान उत्पादन करणारा तालुका धानपट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो. पावसाच्या रिमझिमपणामुळे शेताशेजारी असलेले नाले, ओढे सुध्दा खळखळून वाहताना दिसून येत नाही .त्यामुळे यावर्षी आवत्या पद्धतीने लागवड केलेले धानपीक जोमात तर रोवणी हंगाम कोमात दिसून येत आहे.

310721\1415img-20210717-wa0148.jpg

धान पट्टयात पावसाची हुलकावणी

Web Title: Rains in paddy fields, farmers worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.