चामोर्शीत अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:37+5:302021-07-02T04:25:37+5:30
अनेक भागांत पाणी साचल्यामुळे घाण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या उंच बांधकामामुळे येथील घरे खोल झाली. त्यामुळे नालीतील ...
अनेक भागांत पाणी साचल्यामुळे घाण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या उंच बांधकामामुळे येथील घरे खोल झाली. त्यामुळे नालीतील पाणी वाहून न जाता तिथेच साचून राहते. यातून रोगराई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ६ आणि प्रभाग ८ या दोन्ही वॉर्डची नगरपंचायतने पाहणी करून गोरगरीब नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.
(बॉक्स)
अनेकांची घरे झाली जीर्ण
येथील कमल ढाक, लक्ष्मी काटवाले, ईश्वर वाढई, कविता गोलाईत, देवराव नैताम, सुभाष मशाखेत्री, राजू भांडेकर, सखूबाई ढाक, भारत वैरागडे, गोपाल नंदेश्वर, तुलाराम नंदेश्वर, कृष्णाजी चिचघरे, सोमेश्वर आत्राम, तसेच केशव ढाक यांच्या घरात नेहमी मुसळधार पावसामुळे पाणी शिरते. त्यांची घरे जीर्ण अवस्थेत असल्यामुळे घरे पडण्याची भीती निर्माण झाली आहे, नगरपंचायतला दरवर्षी माहिती देऊनसुद्धा त्यांना घरकुल योजनेच्या लाभ मिळत नाही.