शासकंीय योजनांची जागृती करा

By admin | Published: June 10, 2017 01:45 AM2017-06-10T01:45:20+5:302017-06-10T01:45:20+5:30

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मागील तीन वर्षापासून सामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

Raise awareness of government schemes | शासकंीय योजनांची जागृती करा

शासकंीय योजनांची जागृती करा

Next

खासदारांचे आवाहन : कुरखेडात कार्यविस्तार योजनेचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने मागील तीन वर्षापासून सामान्य नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. जनधन योजना, मुद्रा लोन योजना, गॅस सिलींडरचे वाटप, शेतकऱ्यांकरिता शेतशिवार, मागेल त्याला विहीर, घरकूल यासारख्या विविध योजनेची माहिती गावागावांत पोहोचवावी, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी गुरूवारी केले.
भारतीय जनता पार्टीतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना बैठकीचे आयोजन कुरखेडा येथील किसान मंगल सभागृहात गुरूवारी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या आढावा बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि. प. सभापती नाना नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी ओल्लालवार, रेखा डोळस, प्रकाश गेडाम, तारा कोटांगले, प्रा. डी. मेश्राम, सुरेश मांडवगडे, रवीकिरण समर्थ, बबलू हुसैनी, राम लांजेवार, रोशनी बैस, संगिता रेवतकर, चांगदेव फाये, जि. प. सदस्य पुराम, गणपत सोनकुसरे, जावेद सय्यद, रवींद्र गोटेफोडे, खेमनाथ डोंगरवार, भाग्यवान टेकाम, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, व्यंकटी नागीलवार, नगरसेवक रवींद्र गोटेफोडे, रामहरी उगले, राजन खुणे, अ‍ॅड. उमेश वालदे तसेच इतर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती अंगारा गणातून विजयी ठरलेले अपक्ष उमेदवार श्रीराम दुगा यांनी भाजपात प्रवेश केला. खासदारांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.
केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, अशी माहिती आ. कृष्णा गजबे यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष राम लांजेवार तर आभार चांगदेव फाये यांनी मानले.
 

Web Title: Raise awareness of government schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.