ठाणेगावात वीज केंद्र उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:24 AM2017-11-01T00:24:54+5:302017-11-01T00:25:10+5:30
तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव सर्कलवरून एकूण ४२ गावांचा वीज पुरवठा केला जात असल्याने विजेचा दाब अपुरा पडत असून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे ३३ के व्हीचे वीज उपकेंद्र तयार करण्यात यावे अशी मागणी भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री गोपाल भांडेकर यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांच्याकडे केली आहे.
ठाणेगाव सर्कल आरमोरी तालुक्यातील सर्वाधिक वीज वापर असलेला सर्कल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कृषीपंप, साईसमील, आटाचक्की व घरगुती वीज ग्राहक आहेत. ठाणेगाव येथे रेल्वेस्थानक होत असल्याने या परिसरात उद्योगांची आणखी भर पडण्याची शक्तता आहे. त्यामुळे ठाणेगाव येथे वीजकेंद्र उभारण्यात यावे. ठाणेगावातील वीजकेंद्राचा लाभ आरमोरी व वैरागड सर्कललाही होऊ शकतो. त्यामुळे ठाणेगावातील वीज केद्र उपयोगी ठरणारे आहे. याबाबत अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी रवी भांडेकर, धूरंदर सातपुते, दिपक बैस आदी मान्यवर उपस्थित होते.