राकाँचे ‘गाजर वाटप’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:36 AM2019-01-13T00:36:07+5:302019-01-13T00:37:16+5:30
भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या आश्वासन व धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात शनिवारी ‘गाजर वाटप’ आंदोलन राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजपप्रणित केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या आश्वासन व धोरणांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात शनिवारी ‘गाजर वाटप’ आंदोलन राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण, कोनसरी लोहप्रकल्प, प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार, उज्ज्वला गॅस, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये, दुष्काळग्रस्तांना मदत निधी याबाबतचे आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन खोटे ठरले असून बहुतांश नागरिकांना या योजनांचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या योजना व धोरणांचा निषेध करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गाजर वाटप आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला राकाँच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सोनाली पुण्यपवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, ऋषीकांत पापडकर, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष लिलाधर भरडकर, सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, विनायक झरकर, सुलोचना मडावी, डॉ. देविदास मडावी, जगन जांभुळकर, संजय कोचे, तुकाराम पुरणवार, तालुकाध्यक्ष विवेक बाबणवाडे, जितेंद्र मुपीडवार, नागेश आभारे, प्रकाश मुद्दमवार, संजय शिंगाडे, किशोर बावणे, हबीब खॉ. पठाण, मुज्जफर पठाण, सलीम मन्सुरी, शाखीर कुरेशी, नानाजी सुरपाम, रेखा बारापात्रे, मंदा मडावी, वैशाली गोरडवार, अनुसया गेडाम, निशा रामटेके, सुनिता देऊळपल्लीवार, जगन पटवा, शंकर दिवटे, मलय्या कालवा, पौर्णिमा बारसिंगे, सुजाता शेंडे, दिवाकर करकाडे, नरेंद्र सहारे, दुर्गा बारापात्रे, गीता घोडमारे, अंजू वाळके, निर्मला कांबळे, वच्छला चापले, संगीता भोयर, वर्षा दंडिकवार, काजल दंडिकवार, चंदा डोंगरवार, इंदिरा कलमुलवार, मामता खेवले, जामिनी कुलसंगे, कल्पना डोंगरवार, करिश्मा चौधरी, संगीता कटारे, सुमन मडावी, चंद्रिका रंगारी, माया बावणे, रामेश्वरी लारोकर, अनिता बागडे, अरूणा खोब्रागडे, ज्योत्सना बोदलकर, पुष्पा खोब्रागडे, सुनंदा बोदलकर, अर्चना मामीडवार, वच्छला चापले, संगीता भोयर यांच्यासह पक्षाचे शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.