गडचिरोलीत झाडांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:59 PM2018-08-28T14:59:02+5:302018-08-28T14:59:40+5:30

अहेरी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नगर शाखेच्या वतीने वृक्षांना राखी बांधून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यात आला.

Rakhi parnima celebrated by planting rakhi for the trees in Gadchiroli | गडचिरोलीत झाडांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी

गडचिरोलीत झाडांना राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी

googlenewsNext
ठळक मुद्देअहेरीत अभाविपचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नगर शाखेच्या वतीने वृक्षांना राखी बांधून पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश देण्यात आला.
आधी राखी झाडांना नंतर भावांना या संकल्पनांचा आदर्श घेत अखिल भारतीय विध्यार्थी परिषद नगर कार्यकारणीच्या वतीने झाडांना राखी बांधून पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे असा संदेश दिला. पर्यावरणाचे रक्षण न केल्यास केदारनाथ, केरळमध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती आल्या त्या येऊ शकतात म्हणून पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडांना राखी बांधण्याचा संकल्प अभाविपच्या नेत्यांनी केला आणि झाडांना राखी बांधून हा सण साजरा केला.

 

Web Title: Rakhi parnima celebrated by planting rakhi for the trees in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.