आरमोरीतील महिलांनी सीमेवरील जवानांकरिता पाठविल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:41 AM2021-08-13T04:41:44+5:302021-08-13T04:41:44+5:30
रक्षाबंधन हा भाऊबहिणींच्या अतूट नात्याचा सण आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावांना राखी बांधून त्याच्याविषयी असलेले प्रेम व ...
रक्षाबंधन हा भाऊबहिणींच्या अतूट नात्याचा सण आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावांना राखी बांधून त्याच्याविषयी असलेले प्रेम व जिव्हाळा व्यक्त करते. सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे संरक्षण करतात. त्यांच्या या अमूल्य सेवेसाठी शक्तीनगर येथील महिलांनी जम्मू-काश्मीर, मिझोरम आणि बिहार राज्यात कार्यरत असलेल्या सैनिकांना राख्या पाठविल्या.
याकरिता आरमोरी येथील विद्या सुरेश चौधरी, शोभा मुळे, अंजली सहारे, सुरेखा फुलबांधे, अंजली राऊत, सोनल फुलबांधे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आरमोरीच्या पोस्टातून राख्या रवाना केल्या. दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवरील जवानांना या महिला नित्यनेमाने राख्या पाठवीत असतात हे विशेष.
110821\10311622-img-20210811-wa0042.jpg
सीमेवरील सैनिकाकरिता पाठविण्यात येणाऱ्या राख्या आरमोरी येथील पोस्टमास्तर कडे सुपूर्द करताना विद्या चौधरी व इतर महिला