विधवा महिलांच्या घरी पुनर्वसन समितीतर्फे रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:39 AM2021-08-26T04:39:24+5:302021-08-26T04:39:24+5:30
२३ ऑगस्ट राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये पाेलीस निरीक्षक प्रमाेद बानबले यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्द्या साेनुले, ...
२३ ऑगस्ट राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये पाेलीस निरीक्षक प्रमाेद बानबले यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्द्या साेनुले, स्वाती मगरे, जयश्री गावतुरे आदी काेराेना एकल महिलांनी पाेलीस बांधवांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. महिलांना काही समस्या आल्यास त्यांनी पाेलिसांना मदत मागावी, आम्ही आपल्या पाठीशी सदैव राहू, असे प्रतिपादन ठाणेदार बानबले यांनी केले.
काेराेना एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक मनाेहर हेपट यांनी समितीच्या ध्येय-धाेरणाबाबत माहिती दिली. याप्रसंगी उमेश सहारे, स्नेहल महाडाेळे, पाैर्णिमा साेनुले यांनी सहकार्य केले.
देसाईगंज तालुक्यात कोरोनाने पतीचे निधन हाेऊन विधवा बनलेल्या महिलांच्या घरी जाऊन एकल महिला पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. देसाईगंज तालुक्यातील अनेक महिलांना काेराेनामुळे वैधव्य आले आहे. या महिलांना आधार देण्यासाठी एकल महिला पुनर्वसन समिती काम करत आहे. समितीच्यावतीने एकलपूरच्या वैशाली संतोष सयाम, विसोराच्या दयावती राजू वैद्य, प्रियंका सतीश पेंदाम, पूजा नागमोते, शंकरपूरच्या सारिका अरविंद वालदे, बोडधाच्या पुष्पा गुलाबराम मेश्राम, कोरेगाव येथील योगीता योगेश डोंगरवार यांच्या घरी भेट देऊन रक्षाबंधन करण्यात आले.
यावेळी समितीचे समन्वयक तथा आराेग्य प्रबाेधिनीचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभने, अर्चना गभने व समितीचे कार्यकर्ते यांनी रक्षाबंधन केले. तसेच महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. यशस्वितेसाठी आरती पुराम यांनी सहकार्य केले.