वन शहीदांच्या स्मृतीत आलापल्लीत रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:58 PM2018-09-13T23:58:38+5:302018-09-13T23:59:15+5:30
आलापल्ली वनविभाग,भामरागड वनविभाग, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना व वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वनसभागृह येथे वनशहीद दिन साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली वनविभाग,भामरागड वनविभाग, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना व वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने वनसभागृह येथे वनशहीद दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गडचिरोली वनवृत्तामध्ये वन व वन्यजीवांचे रक्षण करताना विरमरण पत्कारणारे वनशहीद वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, वनरक्षक पेडीचेर्ला, चिचघरे, वनमजूर मेकला, कुंजाम, दुर्गे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी वनशहीदांच्या सन्मानार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला सहायक वनसंरक्षक एच.जी.मडावी यांनी हस्ते हिरवी झंडी दाखविली. रॅली वनसंपदा इमारत येथून सुरू करून आलापल्ली शहराच्या मुख्यमार्गाने फिरविण्यात आली. रॅलीचे समारोप विभागीय कार्यालय येथे करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक सावरडेकर होते. अथिती म्हणून सहाय्यक वनसंरक्षक मडावी, वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील, शेखर तनपुरे, लेले, चौहान, घोंगडे, धोन्नोडे, पुनम बुद्धावार व नितीन कुमरे होते. याप्रसंगी अक्ष्यक्षस्थानावरून बोलताना सावरडेकर यांनी वनाच्या रक्षणार्थ प्राणाची आहुती देणाऱ्या वनशहीदांच्या बलीदानानेच आज वन व वन्यजीव सुरक्षीत असल्याचे म्हटले. तर वनरक्षक-पदोन्नत वनपाल संघटनेचे उपाध्यक्ष सुविनय सरकार यांनी प्रत्येकानी वनशहीद बांधवच्या परिवाराला नियमीत मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमांचे संचालन वनरक्षक वनपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश शेरेकर तर आभार आनंद जुनघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वर मांडवकर, नागोराव सिडाम, साबळे, विनोद शिंदे, प्रदीप गेडाम, बाळु मडावी, राम तोकला, बि.डी.नागोसे, प्रदीप घुटे, गजमीये, भारत निमरड, धनजय कुमरे यांनी सहकार्य केले.