आनंदग्राम जंगलात रानडुकराची शिकार
By Admin | Published: November 4, 2016 12:16 AM2016-11-04T00:16:20+5:302016-11-04T00:16:20+5:30
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी के. डी. पाटील यांनी आपल्या सहकारी वनकर्मचाऱ्यांसह आनंदग्राम
दोघांना एक दिवसांची वन कोठडी : दुचाकीसह साडेतीन किलो मांस जप्त
घोट : मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी के. डी. पाटील यांनी आपल्या सहकारी वनकर्मचाऱ्यांसह आनंदग्राम येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास धाड टाकून रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना दुचाकी व साडेतीन किलो मांसासह अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
विमल बिरेंद्र रॉय (४४), असिम रॉय (४०) दोघेही रा. आनंदग्राम असे वनकोठडीत असलेल्या आरोपींची नावे आहेत. विमल रॉय व असिम रॉय या दोघांनी आनंदग्राम जंगल परिसरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास रानडुकराची शिकार केली. त्यानंतर दुचाकीने आपल्या घरी मांस आणले. मांसाची विल्हेवाट करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी के. डी. पाटील यांनी आरोपीच्या घरी धाड टाकली. येथून रानडुकराचे साडेतीन किलो मांस व दुचाकीसह दोन्ही आरोपींना अटक केली. सदर कारवाई क्षेत्रसहायक ए. टी. नंदुरकर, वनरक्षक श्रीनिवास धानोरकर, राजुरकर, गणेश पस्पुनवार व इतर वनकर्मचाऱ्यांनी केली. (वार्ताहर)