लोकबिरादरी प्रकल्पात रंगला अभिनव फूड फेस्टिव्हल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:31 AM2021-07-25T04:31:10+5:302021-07-25T04:31:10+5:30

‘लोकबिरादरीची पौष्टिक पदार्थांची मेजवानी’ या बॅनरखाली सायंकाळी ५.३० वाजतापासून ७.३० वाजेपर्यंत फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. यावेळी अनेक पौष्टिक ...

Rangala Innovative Food Festival at Lokbiradari Project | लोकबिरादरी प्रकल्पात रंगला अभिनव फूड फेस्टिव्हल

लोकबिरादरी प्रकल्पात रंगला अभिनव फूड फेस्टिव्हल

Next

‘लोकबिरादरीची पौष्टिक पदार्थांची मेजवानी’ या बॅनरखाली सायंकाळी ५.३० वाजतापासून ७.३० वाजेपर्यंत फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. यावेळी अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ लोकबिरादरी प्रकल्पातील महिलांनी प्रेमाने व आनंदाने बनवून सहभाग नोंदविला. यासोबतच लोकबिरादरीतील बच्चे कंपनीकडून या पदार्थांचे पोषक तत्त्वे सांगणारे मनोरंजक खेळ आयोजित केले होते. मोठ्या मेसमध्ये रंगलेल्या या फूड फेस्टिव्हलचा सर्वांनी मनमुराद आनंद लुटला.

यशस्वीतेसाठी मनीषा पवार, शांती गायकवाड, प्राजक्ता चव्हाण, ऋतुजा फडणीस, रुपा हिवरकर, शिल्पा चांगण, सुनीता दुर्गे, राणी मुक्कावार, भक्ती बानोत, निशा ठाकरे या महिलांनी, तसेच अशोक चापले, तुषार कापगते, जमीर शेख, प्रा. खुशाल पवार, प्रा. गिरीश कुलकर्णी, भूषण गाडगीळ, प्रफुल्ल पवार, अशोक गायकवाड, गणेश हिवरकर, प्रवीण अहिरे, सुरेश गुट्टेवार, केतन फडणीस, लीलाधर कसारे, विवेक दुबे, राहुल भसारकर, रैनू आतलामी, अभय मडावी, सुदर्शन ढाकेफळे, वैभव परांजपे व कृष्णा यांनी सहकार्य केले.

(बॉक्स)

आमटे दाम्पत्याने घेतला पदार्थांचा आस्वाद

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे या उभयतांनी फूड फेस्टिव्हलला भेट देऊन पदार्थांचा आस्वाद घेतला. पदार्थांचे गुणधर्म सांगणाऱ्या स्टॉलला भेट देऊन बच्चे कंपनीचे कौतुक केले. यावेळी लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक विलास मनोहर, रेणुका मनोहर प्रामुख्याने उपस्थित होते.

(बॉक्स)

कप केकपासून करवंदाच्या चटणीपर्यंत

लोकबिरादरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व कांचन गाडगीळ यांच्या पुढाकाराने या पौष्टिक फूड फेस्टिव्हलसाठी प्रकल्पातील महिला व पुरुष यांनी विविध पदार्थ बनवून आणले होते. त्यात नाचणी कप केक, नाचणी पाव केक, इन्स्टंट आंबा खरवस, करवंद गोड लोणचे, उकडीचे आंबा मोदक, कुळीथ पुलाव, करवंद सार, रानभाजीची भजी, सोबत करवंद चटणी आदी पौष्टिक व लज्जतदार पदार्थ बनवून विक्रीस ठेवले होते. यात केवळ लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यकर्ते, कर्मचारी व आबालवृद्धांनी पदार्थ खरेदी करून त्याचा आस्वाद घेतला.

Web Title: Rangala Innovative Food Festival at Lokbiradari Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.