रेपनपल्लीत चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:08 AM2017-12-14T00:08:38+5:302017-12-14T00:09:26+5:30
कमलापूर परिसरातील गावांच्या विकासासाठी निधी द्यावा, त्याचबरोबर नागरिकांच्या सामान्य समस्या सोडवाव्या, या मागण्यांसाठी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी,
लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर : कमलापूर परिसरातील गावांच्या विकासासाठी निधी द्यावा, त्याचबरोबर नागरिकांच्या सामान्य समस्या सोडवाव्या, या मागण्यांसाठी कमलापूरच्या सरपंच रजनीता मडावी, अहेरीच्या सभापती सुरेखा आलाम यांच्या नेतृत्वात रेपनपल्ली येथे बुधवारी चक्काजाम आंदोलन केले.
अहेरी उपविभागातील आदिवासी व गैरआदिवासी अतिक्रमणधारकांचे दावे स्वीकारून त्यांना कायमस्वरूपी पट्टे वितरित करावे, कमलापूर येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे, राजाराम व कमलापूर येथे राष्टÑीयकृत बँकेची स्थापना करावी, कमलापूर येथे ३३ केव्ही वीज स्टेशन स्थापन करावे, निराधार व वृद्धापकाळ लाभार्थ्यांचे अनुदान ६०० वरून १५० रूपये द्यावे, चंद्रपूर, गडचिरोलीची बससेवा राजाराममार्गे न्यावी, रेगुलवाही, अंबेझरा, कोलामारका अभयारण्य निर्माण करू नये, अहेरी-आलापल्ली-सिरोंचा रस्ता तत्काळ दुरूस्त करावा, कमलापूर येथे पशुवैद्यकीय अधिकाºयाची नेमणूक करावी, छल्लेवाडा गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, राष्टÑसंत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेली भारतातील पहिली आश्रमशाळा शासनाद्वारे चालवावी आदी मागण्यांसाठी रेपनपल्ली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून कमलापूर भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. या भागाचा विकास करावा, याकरिता परिसरातील नागरिकांच्या वतीने अनेकदा शासन, प्रशासनाला निवेदने देण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले.
आंदोलन सुरू झाल्यानंतर माजी आ. दीपक आत्राम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हा निमंत्रक विजय खरवडे, अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे भास्कर तलांडे आदींनी आंदोलनस्थळाला भेट दिली. उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करून पाठिंबा दर्शविला.
आंदोलनात परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोेलन करण्याचा इशारा दिला. तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, वीज विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.व्ही. बडगू, अहेरीचे आगारप्रमुख वाय.एम. राठोड, वाहतूक नियंत्रक जे.सी. राजवैद्य, वनपरिक्षेत्राधिकारी जे.एम. लांडगे, कमलापूरचे तलाठी सचिन मडावी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.