आलापल्लीत आढळला दुर्मिळ ‘ग्रीन कॅमेलिआॅन’ सरडा
By admin | Published: July 7, 2016 01:34 AM2016-07-07T01:34:00+5:302016-07-07T01:34:00+5:30
सरडा रंग बदलतो हे सगळ्यांनाच माहित आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या तब्बल १६० प्रजाती आहेत.
१६० प्रजाती : वनकर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जंगलात सोडले
आलापल्ली : सरडा रंग बदलतो हे सगळ्यांनाच माहित आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यांच्या तब्बल १६० प्रजाती आहेत. यामध्ये गुलाबी, निळा, लाल, निलमली, पिवळा, हिरवा या रंगाचे सरडे अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे हिरव्या रंगाचा सरडा अतिशय दुर्मिळ समजला जातो. असाच दुर्मिळ असलेला हिरव्या रंगाचा ग्रीन कॅमेलिआॅन सरडा आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मट्टामी कुटुंबीयांना आढळला.
दुर्मिळ सरडा आढळल्याची माहिती होताच आलापल्लीत सरड्याला बघण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. मट्टामी कुटुंबीयांनी यापूर्वी कधीही हिरव्या रंगाचा दुर्मिळ सरडा बघितलेला नव्हता. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती आलापल्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार यांना दिली. त्यांनी तत्काळ वनकर्मचारी टी. यू. गेडाम यांना घटनास्थळी पाठविले. त्यानंतर मट्टामी कुटुंबीय व गावातील नागरिकांनी वनकर्मचारी गेडाम यांच्या सहकार्याने या दुर्मिळ सरड्याला जंगलात नेऊन सोडून दिले. दुर्मिळ हिरव्या रंगाचा सरडा दक्षिण आफ्रिका, दक्षिण युरोप, श्रीलंका या देशातही अनेकदा आढळतो. (प्रतिनिधी)
अतिशय दुर्मिळ असलेला सरडा हा वातावरणानुसार आपला रंग बदलतो. पण या व्यतिरिक्तही अनेक रंगाचे सरडे देखील अस्तित्वात आहेत. हिरव्या रंगाचा दुर्मिळ समजला जाणार सरडा हा प्रामुख्याने मोठ्या जंगलामध्ये आढळतो. हिरव्या सरड्याचे मुख्य खाद्य किडे व फूलपाखरू आहेत. हिरव्या सरड्याची लांबी २५ सेमी असून या सरडाची एक मादी आठवड्यात ८० ते १०० अंडी देते.