गडचिरोलीत आढळला दुर्मिळ जाडरेती जातीचा साप; जिल्ह्यात झाली प्रथमच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:38 AM2017-12-16T11:38:06+5:302017-12-16T11:38:26+5:30
एमआयडीसी गोंडवाना विद्यापीठ परिसरातील सचिन सातपुते यांच्या संरक्षक भिंतीलगत दुर्मीळ जाडरेती सर्प (स्टाऊट सँड स्नेक) गुरूवारी आढळून आला.
Next
ठळक मुद्देसर्पमित्रांनी दिले जीवदान
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : एमआयडीसी गोंडवाना विद्यापीठ परिसरातील सचिन सातपुते यांच्या संरक्षक भिंतीलगत दुर्मीळ जाडरेती सर्प (स्टाऊट सँड स्नेक) गुरूवारी आढळून आला. याची माहिती सर्पमित्र अजय कुकुडकर यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठून सापाला पकडले. त्यानंतर निरीक्षणासाठी वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. सदर साप अत्यंत दुर्मीळ असून जिल्ह्यात पहिल्यांदाच त्याची नोंद झाली आहे. जाडरेती सापाला शुक्रवारी गडचिरोली लगतच्या जंगल परिसरात सोडून देण्यात आले. याप्रसंगी अजय कुकुडकर, दैैवत बोदेले, श्रीकांत कुळमेथे उपस्थित होते.