वडसात राष्ट्रसंताची पालखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 10:23 PM2017-12-24T22:23:07+5:302017-12-24T22:23:22+5:30
येथील श्री गुरूदेव सेवाश्रम हनुमान वार्डाच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान याप्रसंगी देसाईगंज शहरातून राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : येथील श्री गुरूदेव सेवाश्रम हनुमान वार्डाच्या वतीने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान याप्रसंगी देसाईगंज शहरातून राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.
भजनाच्या दिंडीत काढण्यात आलेल्या या राष्ट्रसंताच्या पालखीच्या मिरवणुकीमध्ये श्री क्षेत्र मानवसंधान केंद्राचे प्रमुख नाना महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. तुकडोजी महाराजाच्या जीवन प्रवासावर मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जीवनाचे सत्य जाणून घेण्यासाठी ग्रामनाथाला अर्पण केलेल्या ग्रामगितेचे पठण होणे काळाची गरज आहे. राष्ट्रसंताच्याा विचाराची प्रेरणा अंगीकारून ध्यान व प्रार्थना नियमित केली तर मनुष्य जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी गुरूदेवभक्त उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रशांत पिंजरकर, पिंटू जांभुळकर, मारोतराव लेनगुरे, रामकृष्ण सहारे, नरहर शेट्टीवार, प्रियंका भागडकर, शांता दिघोरे, दीपक मेश्राम यांनी सहकार्य केले.