कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:44+5:302020-12-25T04:28:44+5:30

सेवायोजन कार्यालय ठरतेय कुचकामी गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ...

The rate of family planning increased | कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले

कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले

Next

सेवायोजन कार्यालय ठरतेय कुचकामी

गडचिरोली : पूर्वी येथील सेवा योजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखत पत्र पाठविण्यात येत होते. मात्र आता ऑनलाईन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगारी नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाही. त्यामुळे सेवायोजन कार्यालय कुचकामी ठरल्याचे दिसून येते.

सिरोंचा शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

सिरोंचा : शहरातील विविध वॉर्डांत अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजारी लोकांची संख्या वाढत चालली आहे. नगर पंचायतीने शहरात फवारणी करावी.

शेकडो नागरिक उघड्यावरच जातात शौचास

गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र बांधलेल्या शौचालयाचा १०० टक्के वापर होताना दिसून येत नाही. अद्यापही ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. अनेक गावांमध्ये शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे, हे खरे पण त्यांचा उपयोग होताना दिसत नाही.

चौक व बाजार परिसरात स्वच्छतागृहे उभारा

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी जागा नाही. काही नागरिक इंदिरा गांधी चौकात असलेल्या सभागृहात लघुशंका करतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे.

Web Title: The rate of family planning increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.