रेशनचे तांदूळ विक्रीला; १६ रुपये किलाेने खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:43 AM2021-09-14T04:43:00+5:302021-09-14T04:43:00+5:30
बाॅक्स ..... धान्य रेशन दुकानातून थेट खरेदीदाराच्या घरी गडचिराेली शहरातील काही नागरिक रेशन दुकानातून तांदळाची उचल केल्यानंतर हे तांदूळ ...
बाॅक्स .....
धान्य रेशन दुकानातून थेट खरेदीदाराच्या घरी
गडचिराेली शहरातील काही नागरिक रेशन दुकानातून तांदळाची उचल केल्यानंतर हे तांदूळ थेट खरेदीदाराच्या घरी घेऊन जातात. ३ रुपये किलाेने खरेदी केलेले तांदूळ १६ रुपये किलाेने खरेदीदारास विकून उर्वरित पैसे घेऊन घरी पाेहाेचतात. तांदळाची विक्री केली जात असली तरी गहू मात्र विकला जात नाही. कारण खुल्या बाजारपेठेत गहू २५ ते ३० रुपये किलाे आहे. त्यामुळे गव्हाची विक्री हाेत नाही.
बाॅक्स .....
शासनाचे उलटे धाेरण
गडचिराेली जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांना गव्हाची आवश्यकता आहे. त्यामुळे तांदूळ व गहू देतेवेळी गहू जास्त देणे आवश्यक हाेते. मात्र, प्रती व्यक्ती ५ किलाे धान्य देताना त्यात २ किलाे गहू व ३ किलाे तांदूळ दिले जाते. यापूर्वी काही वर्षे तर १ किलाे गहू व ४ किलो तांदूळ दिले जात हाेते. रेशनचे तांदूळ ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक खात नाहीत. त्यामुळे ते थेट विक्री करतात. गडचिराेली जिल्ह्यात धानाचे उत्पादन अधिक हाेत असल्याने येथील नागरिक भात अधिक खातात. त्यामुळे तांदूळ अधिक देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
बाॅक्स ..
खरेदीदार फिरतात गावभर
ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक रेशनचे तांदूळ विक्री करीत असल्याने तांदूळ खरेदीदार प्रत्येक घरी जाऊन किंवा पुकारा देऊन तांदूळ खरेदी करतात. घरबसल्या विक्रीची साेय उपलब्ध झाली आहे.
बाॅक्स ....
अनेक अपात्र नागरिकांना मिळते रेशन
४० ते ५० हजार रुपये महिना कमविणाऱ्यांनाही रेशनचे धान्य दिले जाते. त्यामुळे हे नागरिक रेशनचे तांदूळ खात नाहीत, तर त्याची विक्री करतात. गरजवंत व्यक्ती कधीच विक्री करीत नाही. अनेक धनदांडग्या कुटुंबांना रेशनचे धान्य मिळते.