रोवणी ३२ टक्क्यांवर थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 12:16 AM2017-08-04T00:16:21+5:302017-08-04T00:16:49+5:30
मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने बहुतांश शेतकºयांच्या शेतातील पाणी आटले आहे. शेत कोरडे पडले आहे. त्यामुळे रोवणीची कामे जवळपास ठप्प पडली असून रोवलेले धान पिकही करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हाभरात १ लाख १९ हजार ७५ हेक्टरवर रोवणी करायची आहे. मात्र २ आॅगस्टपर्यंत केवळ ३७ हजार ९४७ हेक्टरवरच रोवणीची कामे झाली आहेत. टक्केवारीमध्ये प्रमाण ३१.८४ टक्के एवढी आहे. रोवलेले धान पिकही पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर खरीप हंगामात विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून खरीप हंगामात १ लाख ५३ हजार हेक्टरवर धान पीक लावले जाते. यापैकी ३७ हजार ९४७ हेक्टरवर धानाची रोवणी झाली आहे. १५ दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. नद्या, नाल्या, ओसंडून वाहू लागल्या. काही भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाच रोवणीच्या कामाला सुरूवात झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. पावसाच्या उसंतीनंतर जवळपास पाच ते सहा दिवसच रोवणे चालले. त्यातही सर्वच शेतकºयांनी रोवणीला सुरूवात केल्याने मजूर मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे पाहिच्या त्या प्रमाणात रोवणीची कामे झाली नाहीत. त्यानंतर मात्र पावसाने कायमची उसंत घेतली. धानाच्या बांध्यांमधील पाणी आटण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांच्या रोवणीची कामे आठ दिवसांपूर्वी पासूनच थांबली आहेत. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही केवळ ३२ टक्केच क्षेत्रावर रोवणीची कामे झाली असल्याचे दिसून येत आहे. दमट वातावरणामुळे रोगांवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी रोवणीची कामे सोडून पºह्यांवर कीटकनाशकांची फवारणी करीत आहे. दुष्काळ पडल्यास धान रोवणीसाठी आलेला खर्चही भरून निघणे कठीण होणार असल्याने शेतकºयांची चिंता वाढणार आहे.
सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस
२ आॅगस्टपर्यंत जिल्हाभरात ७३० मिमी पाऊस पडायला पाहिजे. मात्र यावर्षी केवळ ६०२ मिमी पाऊस झाला आहे. दरवर्षी पडणाºया सरासरीच्या ८२ टक्केच पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी पडलेला पाऊस तीन-चार दिवसच पडला. त्यानंतर मात्र पावसाने उसंत घेतली. मोठा पाऊस झाल्याने बहुतांश पाणी वाहून गेले. सरासरीच्या जवळपास जरी पाऊस झाला असला तरी पावसात नियमितता राहिली नसल्याने धानाच्या बांध्यांमध्ये पाणी साचून नाही. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली असल्याचे दिसून येते. काही शेतकºयांनी तलाव, बोड्या फोडून शेतांना पाणी देण्यास सुरूवात केली आहे. मात्र यानंतर पाऊस न झाल्यास सदर शेतकरी अडचणीत येणार आहेत. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
दुष्काळजन्य परिस्थिती
शेतकºयांच्या रोवणीची कामे थांबली आहेत. त्याचबरोबर मागील आठ दिवसांपासून दिवसा कडक ऊन पडत असल्याने रोवलेल्या बांधीमधील पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे जमिनीला भेगा जाण्यास सुरूवात झाली आहे. पुढील चार दिवस उष्णतामान कायम राहून पाऊस न झाल्यास रोवलेले धान, पºहे करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पुढील आठ दिवस पाऊस येईल, याची चिन्हे दिसत नाही. सरकारने कर्जमाफी केली. मात्र पीक झाले नाही तर शेतकरी वर्ग आणखी कर्जाच्या खाईत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.