नझूलच्या जागेवरील बँकांना आरबीआयची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2017 01:11 AM2017-05-05T01:11:34+5:302017-05-05T01:11:34+5:30
देसाईगंज येथील काही राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका नझूलच्या जागेवरील इमारतीमध्ये अवैधरितीने किरायाणे आहेत.
बँकांमध्ये खळबळ : देसाईगंज येथील प्रकार
देसाईगंज : देसाईगंज येथील काही राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका नझूलच्या जागेवरील इमारतीमध्ये अवैधरितीने किरायाणे आहेत. सदर प्रकरणाला प्रसार माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर रिझर्व बँक आॅफ इंडियाने २६ एप्रिल रोजी बँकांना नोटीस बजावून अशा अवैध जागेवर राहून आपण आपला व्यवसाय करू शकत नाही, असे म्हटले आहे.
नझूलची जागा सरकारी आहे. सदर जागा काही वर्षांच्या करारावर संबंधित व्यक्तीला देण्यात आली आहे. या करारानुसार ही जागा तिसऱ्या व्यक्तीला किरायाणे देता येत नाही. असे असतानाही नझूलच्या जागेवरील इमारतीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांनी अनेक वर्षांपासून बस्थान मांडले आहे. हा सर्व प्रकार अनधिकृत असल्याने याबाबतच्या तक्रारीनुसार नझूलच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान शासनासोबत असलेल्या अटी व शर्तीचा लिजधारकांनी भंग केला आहे. अशा जागेवर राष्ट्रीयकृत बँका आहेत. अशा जागेवर राष्ट्रीयकृत बँका राहू शकत नाही, असे रिझर्व बँक आॅफ इंडियाने देसाईगंज येथील बँकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.