वाघाच्या बंदाेबस्तासाठी पुन्हा साखळी उपाेषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:54+5:302021-09-27T04:39:54+5:30
वाघ पकडण्याची परवानगी मिळाल्यास ४८ तासांच्या आत वाघाला जेरबंद करू, असे आश्वासन वनसंरक्षक यांनी दिले हाेते. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ...
वाघ पकडण्याची परवानगी मिळाल्यास ४८ तासांच्या आत वाघाला जेरबंद करू, असे आश्वासन वनसंरक्षक यांनी दिले हाेते. त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून आंदाेलन मागे घेण्यात आले. मात्र वाघ पकडण्याची परवानगी मिळून आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी पूर्ण हाेत आहे. मात्र वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. नागरिकांचे बळी जात असताना वनविभागाचे अधिकारी वाघाला पकडण्यास फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेलीचे वनसंरक्षक, तसेच देसाईगंज व गडचिराेली वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विजय खरवडे व शेतकऱ्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला भ्रष्टाचारविराेधी जन आंदाेलनाचे जिल्हा संपर्कप्रमुख याेगाजी कुडवे, धनंजय डाेईजड, संजय बाेबाटे, रवींद्र सेलाेटे, चंद्रशेखर सिडाम, टिपेश आकेवार आदी उपस्थित हाेते.