शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:23 AM2021-06-27T04:23:45+5:302021-06-27T04:23:45+5:30
आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०२०-२१ मध्ये मका पिकाची लागवड केलेली होती. शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी संस्थेकडे ...
आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रबी हंगाम २०२०-२१ मध्ये मका पिकाची लागवड केलेली होती. शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी संस्थेकडे सातबारा जमा करून ऑनलाइन केले. आरमोरी येथे शासकीय हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू झाले; परंतु फक्त ७२ शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यात आला व १९ जूनला मका खरेदी केंद्राचा कोटा पूर्ण झाल्याचे सांगून खरेदी केंद्र बंद करण्यात आले. अजून अनेक शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून मका विक्रीपासून ते वंचित आहेत. खुल्या बाजारपेठेत मक्याला अतिशय कमी भाव आहे. खुल्या बाजारपेठेत मका विकला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागेल. मका लागवडीसाठी लागलेला उत्पादन खर्चही निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होण्याची शक्यता आहे. मका विक्रीसाठी ऑनलाइन सातबारा केलेल्या शेतकऱ्यांच्या मका खरेदी साठी शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी रवींद्र नैताम, शालिकराम राऊत, अंताराम ढोंगे, वसंत टीचकुले, अरविंद खोब्रागडे, शोभा करपाते, संदीप बारापात्रे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
===Photopath===
240621\34403701img-20210624-wa0061.jpg
===Caption===
शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी तहसीलदाराना निवेदन देताना शेतकरी