गरजूंपर्यंत योजना पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 06:00 AM2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:25+5:30

हस्तकला प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात राहूल गायकवाड यांनी प्रथम, मोहिनी गायकवाड द्वितीय तर प्रांजल वझाडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रूपये पुरस्कार देऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Reach out schemes to the needy | गरजूंपर्यंत योजना पोहोचवा

गरजूंपर्यंत योजना पोहोचवा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांचे आवाहन : जनजागरण मेळाव्यात रेशन कार्ड व एसटी पासेसचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध विभागामार्फत नागरिकांच्या विकासासाठी योजना राबविल्या जातात. वैैयक्तिक लाभाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सोमनाथ माळी यांनी केले.
जिल्हा पोलीस प्रशासन व पोलीस स्टेशन कुरखेडाच्या वतीने तालुक्यातील आंजनटोला येथे सोमवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार सुधाकर देडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून सरपंच संजय कोरेटी, उपसरपंच संजय मिरी, नायब तहसीलदार ए. बी. मडावी, प्रा. नागेश फाये, अन्न व पुरवठा निरीक्षक रामकृष्ण कुथे, आरोग्य सेवक आर. एम. येगलवार, बसस्थानक प्रमुख राजेश राठोड, रामेश्वर होळकर, हत्तीरोग निरीक्षक टी. जे. कापगते, वनरक्षक नाकाडे, गुलाब सोनकुकरा, रमेश मडावी, डी. एच. आचला, अगरसिंग खडाधार, ग्रामसचिव मुरलीधर मेश्राम, पोलीस पाटील योगराज नाकाडे, विश्वनाथ रामटेके, शबनम पठाण आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपजिल्हा रूग्णालयातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अन्न पुरवठा विभागातर्फे शिधापत्रिका तर महामंडळाच्या वतीने एसटी बस पासेसचे वितरण करण्यात आले.
यावेळी सामूहिक व एकल नृत्य स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. हस्तकला प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात राहूल गायकवाड यांनी प्रथम, मोहिनी गायकवाड द्वितीय तर प्रांजल वझाडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रूपये पुरस्कार देऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक पोलीस पाटील प्रेम पंधरे, संचालन मनोज सोनकुकरा तर आभार पुंडलिक नैैताम यांनी मानले. यावेळी शेकडो नागरिक हजर होते.

Web Title: Reach out schemes to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.