पुस्तकांच्या वाचनाने वाचन प्रेरणा दिन साजरा
By admin | Published: October 16, 2015 01:59 AM2015-10-16T01:59:13+5:302015-10-16T01:59:13+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन गुरूवारी वाचन प्रेरणादिन म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी पुस्तकांच्या वाचनाने साजरा करण्यात आला.
गडचिरोली : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन गुरूवारी वाचन प्रेरणादिन म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी पुस्तकांच्या वाचनाने साजरा करण्यात आला.
कृषक हायस्कूल, चामोर्शी : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाला मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, शिक्षक मोरेश्वर गडकर, संजय कुनघाडकर, लोमेश्वर पिपरे, गिरीश मुंजमकर, अविनाश भांडेकर, प्रकाश मठ्ठे, जासुंदा जनबंधू, वर्षा लोहकर, लोमेश बुरांडे, दिलीप लटारे, दिलीप भांडेकर, अरूण दुधबावरे, मारोती दिकोंडवार, गणेश गव्हारे उपस्थित होते. दरम्यान शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. पुस्तक प्रदर्शनात नामवंत लेखक, कवी, शास्त्रज्ञ व अन्य क्षेत्रातील मान्यवरांची पुस्तके ठेवण्यात आली होती.
श्री तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय, कढोली : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी. जी. जुमडे होते. यावेळी प्रा. के. एस. टिकले, प्रा. एस. एम. जुआरे, प्रा. प्रदीप बोडणे, प्रा. बावनकर उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. जुमडे म्हणाले, महत्त्वपूर्ण क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत डॉ. अब्दुल कलाम यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
कर्मवीर विद्यालय, वासाळा : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थी दप्तराविना शाळेत आले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त आपापल्या पसंतीनुसार पुस्तकांचे वाचन केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय. बी. मडावी होते. यावेळी विनोद कुनघाडकर, मुकेश वालोदे, प्रा. रामटेके, प्रा. आलबनकर, जोशी, कुथे, घाटोळे, शेंडे, सावजी शेंडे, जौजाळकर उपस्थित होते.
महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ. रमेश ठोंबरे होते. प्रमुख अतिथी म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. सतेंद्र सोनटक्के, प्रा. छगन मुंगमोडे, डॉ. उमेश कोसुरकर, प्रा. राकेश नाकतोडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन सोनटक्के तर आभार लक्ष्मण निमजे यांनी मानले.
महात्मा गांधी कन्या विद्यालय, आरमोरी : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शरद जौजालकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक बी. व्ही. हेमके, वंदना चव्हाण, मडके, प्रकाश पंधरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रेमलाल सयाम तर आभार हेमंत निखारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी वीरेंद्र गुंफावार, मडावी, मीना परतेकी, रवींद्र लोखंडे, हिवराज सयाम, गौरव नारनवरे, ग्रंथपाल शैलेश कापकर, भानारकर, गराडे, विजय हेमके, रमेश सेलोकर उपस्थित होते.
इंदिरा गांधी महाविद्यालय, गडचिरोली : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रकाश अर्जुनवार होते. यावेळी प्रा. राजन बोरकर, प्रा. मनोज लाडे, प्रा. पवन माटे, प्रा. एस. सी. सुरपाम उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. संचालन संदीप मट्टामी तर आभार प्रीती मडावी हिने मानले.
श्री किसनराव खोब्रागडे महिला महाविद्यालय, गडचिरोली : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट होते. यावेळी प्रा. एस. सुरपाम, प्रा. येगलोपवार, प्रा. रायपुरे, प्रा. नैताम, प्रा. बोधलकर उपस्थित होते. संचालन सलोनी बोदेले तर आभार पल्लवी बांबोळे हिने मानले.
विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, विसोरा : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. व्ही. कापगते होते. प्रमुख अतिथी म्हणून एस. आर. बुद्धे, पी. जी. कुळसंगे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन केले. संचालन अतुल बुराडे तर आभार एच. जी. मडावी यांनी मानले.
किसान विद्यालय, कोरेगाव : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गरंजी : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाला मुख्याध्यापक विजय कारखेले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तु हिचामी, सन्यासी हिचामी, तुळशिराम नरोटे, रवींद्र मरस्कोल्हे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले.
जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक आंबेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून अमोल वळसंग, प्रा. तुंगीडवार, एम. एन. चलाख उपस्थित होते. यावेळी तुंगीडवार व वळसंग यांनी मार्गदर्शन केले. प्रा. गौतम डांगे यांनी अनेक पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिली. आभार प्रशांत तोटावार यांनी मानले. प्रा. रश्मी डोके, उके, विजय साळवे, रजनी मडावी, रवी नारनवरे, कोहाडे, कोरेवार यांनी सहकार्य केले.
शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, आमगाव (म.) : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विनोद हनमलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून निमकर, पाचभाई, बैस, गांगरेड्डीवार, चिटमलवार, रामटेके, मंडल, निमजे, बारसागडे, पुण्यपकार, अंकलवार, बंडावार, श्रुती रामगोनवार, पोहणकर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले.
जय पेरसापेन माध्यमिक विद्यालय, जांभळी : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाला मुख्याध्यापिका दाजगाये, अवथरे, खांडरे उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान इयत्ता आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना विविध पुस्तके देऊन वाचन करण्यास सांगण्यात आले. तसेच अन्य विद्यार्थ्यांचे वाचडी वाचनही घेण्यात आले. यशस्वीतेसाठी पिल्ली व बोमावार यांनी सहकार्य केले.
प्रियंका हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, कनेरी : वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजय नार्लावार होते. प्रमुख अतिथी म्हणून ए. टी. गंडाटे, सी. एस. हुलके उपस्थित होते. यावेळी ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य संजय नार्लावार, डी. एस. गडपल्लीवार, शालेय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन एस. एल. गायकवाड तर आभार नंदनवार यांनी मानले. (लोकमत न्यूज नेटवर्क)