हातपंपाच्या सभाेवताली घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:25+5:302021-03-05T04:36:25+5:30
चामाेर्शी : चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या माेहाेेर्ली (माे.) येथील स्मशानभूमीतील हातपंपाच्या सभाेवताली अस्वच्छता पसरली असून, याठिकाणी ...
चामाेर्शी : चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या माेहाेेर्ली (माे.) येथील स्मशानभूमीतील हातपंपाच्या सभाेवताली अस्वच्छता पसरली असून, याठिकाणी गवत वाढले आहे. येथील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माेहाेर्ली (माे.) येथे स्वतंत्र ग्रामपंचायत असून, येथील स्मशानभूमीत १५ वर्षांपूर्वी हातपंप बसविण्यात आला. या हातपंपाचा सिमेंट काँक्रिटचा ओटा पूर्णत: फुटला आहे. त्यामुळे येथे गवत वाढले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावात गोड पिण्यायोग्य पाण्याची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांना क्षारयुक्त खारे पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून हातपंपामध्ये नियमित ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही, असा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. हातपंप व विहिरीच्या पाण्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.