हातपंपाच्या सभाेवताली घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:32 AM2021-04-03T04:32:40+5:302021-04-03T04:32:40+5:30

आमगाव (म.) : चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या माेहाेेर्ली (माे.) येथील स्मशानभूमीच्या हातपंप सभाेवताली अस्वच्छता पसरली असून ...

The realm of dirt around the assembly of the hand pump | हातपंपाच्या सभाेवताली घाणीचे साम्राज्य

हातपंपाच्या सभाेवताली घाणीचे साम्राज्य

Next

आमगाव (म.) : चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या माेहाेेर्ली (माे.) येथील स्मशानभूमीच्या हातपंप सभाेवताली अस्वच्छता पसरली असून या ठिकाणी गवत वाढले आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. माेहाेर्ली (माे.) येथे स्वतंत्र ग्रामपंचायत असून येथील स्मशानभूमीत १५ वर्षांपूर्वी हातपंप उभारण्यात आला. या हातपंपाचा सिमेंट काँक्रिटचा ओटा पूर्णत: फुटला आहे. त्यामुळे येथे गवत वाढले आहे. ग्रा. पं. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गावात गाेड पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांना क्षारयुक्त खारे पाणी प्यावे लागत आहे. ग्रा. पं. प्रशासनाकडून हातपंपामध्ये नियमित ब्लिचिंग पावडर टाकले जात नाही, असा आराेप गावातील नागरिकांनी केला आहे. हातपंप व विहिरीच्या पाण्याच्या समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावातील नागरिकांकडून हाेत आहे.

Web Title: The realm of dirt around the assembly of the hand pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.