सौरकृषीपंपासाठी १२१ अर्ज प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:19 AM2019-01-13T00:19:45+5:302019-01-13T00:21:59+5:30

शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते.

Receive 121 applications for Solarisprimpa | सौरकृषीपंपासाठी १२१ अर्ज प्राप्त

सौरकृषीपंपासाठी १२१ अर्ज प्राप्त

Next
ठळक मुद्देअर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच : अनुदानावर उपलब्ध होणार सौरकृषीपंप

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांना कृषीपंपाला वीज पुरवठा देण्याऐवजी सौरकृषीपंप अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने अवलंबिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर जनजागृती शिबिर शुक्रवारी घेण्यात आले होते. सहा तालुक्यातील ४३० शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. १२१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांला अत्यंत कमी किंमतीत वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जात होता. मात्र अनेक पंपांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे वाढल्या होत्या. योग्य दाबाचा वीज पुरवठा व्हावा, यासाठी प्रत्येक शेतकºयाला स्वतंत्र डीपी बसवून देण्याचा निर्णय शासनाने सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. डीपी बसविण्यासाठी अडीच लाखांपेक्षा अधिक खर्च येत होता. डीपी बसविल्यावर शेतकऱ्याला वीज बिल भरावे लागत होते. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना सौरकृषीपंप देण्याचे धोरण अवलंबिले आहे. सौरकृषीपंपासाठी सुध्दा जवळपास अडीच ते तीन लाख रूपयांचा खर्च येणार आहे. जवळपास पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा वगळता उर्वरित खर्च शासन करणार आहे. सौरकृषीपंपासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात एकाच दिवशी शुक्रवारी जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेतकºयांनी अर्ज कसा करावा, त्यासाठी आवश्यक असलेले दाखले व सौरकृषीपंपाचे फायदे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
गडचिरोली विभागात कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, धानोरा, कोरची या सहा तालुक्यांमध्ये शिबिर घेण्यात आले. या शिबिरांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गडचिरोली येथील शिबिराला २५ शेतकरी उपस्थित होते. त्यापैकी १२ अर्ज प्राप्त झाले. आरमोरी येथे ८४ शेतकरी उपस्थित होते. २० अर्ज प्राप्त झाले. देसाईगंज येथे २० शेतकरी उपस्थित होते. १३ अर्ज प्राप्त झाले. कुरखेडा येथे १५० शेतकरी उपस्थित होते. ७२ अर्ज प्राप्त झाले. धानोरात १२३ शेतकरी उपस्थित होते. २० अर्ज प्राप्त झाले. कोरचीत २८ शेतकरी उपस्थित होते. चार अर्ज प्राप्त झाले. असे एकूण सहा तालुक्यांमध्ये ४३० शेतकरी उपस्थित होते. एकूण १२१ अर्ज प्राप्त झाले.
गडचिरोली जिल्ह्यातील गावांपर्यंत वीज पुरवठा झाला आहे. मात्र शेतांमध्ये स्वतंत्र वीज लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे शेत गावापासून चार ते पाच किमी अंतरावर असल्यास त्याला वीज पुरवठा करण्यास अधिकचा खर्च येईल. त्यामुळे त्याला वीज जोडणी मिळण्यास निश्चितच विलंब होईल. सौरकृषीपंपाला वीज जोडणीची गरज नाही. त्यामुळे लाभार्थ्याला सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप दिल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल.

विजेवरील पंपापेक्षा सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. या पंपाचे बिल भरण्याची आवश्यकता राहत नाही. अर्जासोबत शेतकऱ्यांना सातबारा, जातीचा दाखला, पाणी सुविधा असल्याची सोय आदी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता कार्यालयात अर्ज करावा.
- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, वीज विभाग गडचिरोली

Web Title: Receive 121 applications for Solarisprimpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.