१४ हजार ८९२ विद्यार्थिनींचा दैनंदिन उपस्थिती भत्ता गाेठविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:32+5:302021-03-04T05:08:32+5:30

गडचिराेली : दरवर्षी गाेरगरीब विद्यार्थिनींना शालेय उपस्थितीसाठी सरकार प्रति दिवसाला एक रुपया भत्ता देत हाेते. मात्र यंदा काेराेनामुळे ...

Received daily attendance allowance of 14 thousand 892 female students | १४ हजार ८९२ विद्यार्थिनींचा दैनंदिन उपस्थिती भत्ता गाेठविला

१४ हजार ८९२ विद्यार्थिनींचा दैनंदिन उपस्थिती भत्ता गाेठविला

Next

गडचिराेली : दरवर्षी गाेरगरीब विद्यार्थिनींना शालेय उपस्थितीसाठी सरकार प्रति दिवसाला एक रुपया भत्ता देत हाेते. मात्र यंदा काेराेनामुळे राज्य संकटात असल्याचे कारण पुढे करून विद्यार्थिनींचा हा एक रुपयाचा भत्ताही शासनाने गाेठविला आहे. याचा फटका गडचिराेली जिल्ह्यातील १४ हजार ८९२ विद्यार्थिनींना यंदा बसला आहे. या विद्यार्थिनी उपस्थिती भत्त्याच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

इयत्ता पहिली पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींना दिवसाला एक रुपया किंवा वर्षाला जास्तीत जास्त २२० रुपये याप्रमाणात दैनंदिन उपस्थिती भत्ता दिला जाताे. सन १९९२ पासून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ही याेजना निरंतर राबविली जात आहे. मात्र काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे निधी खर्चात काटकसर करण्याच्या नावाखाली विद्यार्थिनींचा हा दैनंदिन उपस्थिती भत्ता यावर्षी गाेठविण्यात आला. शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दैनंदिन उपस्थिती भत्ता थांबविण्याचे आदेश दिले आहे.

यावर्षी जिल्ह्यात या याेजनेच्या १४ हजार ८९२ लाभार्थी विद्यार्थिनी आहेत. यांना उपस्थिती भत्ता दिला नाही. जिल्ह्यात यंदा या याेजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील ५ हजार ३१२, अनुसूचित क्षेत्र व बिगर आदिवासी क्षेत्रातील मिळून ७ हजार ११३ तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील २ हजार ४६७ विद्यार्थिनी पात्र आहेत.

बाॅक्स...

गतवर्षीच्या सत्रात विद्यार्थिनींना दिला भत्ता

गतवर्षीच्या शैक्षणिक सत्रात बिगर आदिवासी क्षेत्रातील एकूण १० हजार ८८५ व आदिवासी अर्थात पेसा क्षेत्रातील ३ हजार ९१४ अशा एकूण १४ हजार ७९९ विद्यार्थिनींना उपस्थिती भत्त्याचा लाभ देण्यात आला. या भत्त्यामुळे विद्यार्थिनींच्या कुटुंबांना आर्थिक हातभार लागला.

भत्ता झाल्याचा काय परिणाम झाला?

- गडचिराेली जिल्ह्यात दरवर्षी विद्यार्थिनींना उपस्थिती भत्ता मिळत असल्याने विद्यार्थिनीही आनंदी राहत हाेत्या.

- यावर्षी भत्ता न मिळाल्याने मजूरवर्गीय पालक मुलींना शाळेत पाठविण्यास फारसे उत्सुक नसल्याचे काही भागात दिसून येते.

दिवसाला एक रुपया, ताेही केला बंद

- शाळेत दाखल असलेल्या मुली शाळेत नियमित याव्या, त्यांचे शिक्षण मध्येच खंडित हाेऊ नये, याकरिता राज्य शासनाने उपस्थिती भत्त्याची याेजना सुरू केली.

- या याेजनेतून मुलींना प्रत्येक दिवशीच्या उपस्थितीसाठी केवळ एक रुपया दिला जात हाेता.

- एक रुपयादेखील देणे शासनाला जड झाले आहे. यंदा काेराेनाच्या नावाखाली हा भत्ता थांबविण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थिनीसह पालक सरकारच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत.

काेट...

विद्यार्थिनींची शाळेतील गळती थांबविता यावी, दैनंदिन उपस्थिती वाढावी, या उद्देशाने शासनाने उपस्थिती भत्त्याची याेजना सुरू केली. मात्र यंदा काेराेनामुळे शाळा भरल्या नाहीत. आता या उपस्थिती भत्त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय यंदा उपस्थिती भत्ता देऊ नये, अशा सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या आहेत.

- आर.पी. निकम, शिक्षणाधिकारी

दरवर्षी शाळेत गेल्याबद्दल उपस्थिती भत्त्यापाेटी विद्यार्थिनींना पैसे मिळत हाेते. यावर्षी शाळा बंद आहे. त्यामुळे पैसे मिळणार किंवा नाही, याबद्दल माहिती नाही. मात्र उपस्थिती भत्त्याचे पैसे मिळाले तर आमच्यासारख्या पालकांना बरे हाेईल. राज्य सरकारने भत्ता द्यावा तसेच एक रुपयाऐवजी प्रति दिवसाला किमान १० रुपये भत्ता देण्यात यावा, अशी मागणी आहे.

- पुंडलिक पदा, पालक

यावर्षी काेराेनामुळे आमची शाळा भरली नाही. सरांनीही शाळेत येऊ नका, काेराेनाबाबत घरीच राहून काळजी घ्या, असे सांगितले. शाळेत गेलाे असताे तर आम्हा मुलींना शासनाकडून उपस्थिती भत्ता मिळाला असता. यामुळे आमच्या खर्चासाठी हातभार लागला असता.

- प्रेमिला सावरबांधे, विद्यार्थिनी

वर्षातून कधीतरी हा भत्ता दरवर्षी मिळत हाेता. मात्र यंदा शाळेत न गेल्याने पैसे मिळणार की नाही, हे सांगता येत नाही. पैसे मिळाले तर मला व माझ्या सर्व मैत्रिणींना आनंद हाेईल. या पैशातून आम्हाला चांगली वस्तू खरेदी करता येईल. शासनाने भत्ता द्यावा, अशी आमची मागणी आहे.

- रक्षा खंडाळे, विद्यार्थिनी

Web Title: Received daily attendance allowance of 14 thousand 892 female students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.