जिल्हा विकास निधीसाठी मिळाले २५६ काेटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:21+5:302021-01-08T05:56:21+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विभागाच्या निधीमध्ये कपात केली. कपात केलेला बहुतांश निधी काेराेनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरला जात ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अनेक विभागाच्या निधीमध्ये कपात केली. कपात केलेला बहुतांश निधी काेराेनाची साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरला जात हाेता. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील स्थानिक विकास निधीचा पहिला हप्ता मे महिन्यात उपलब्ध करून दिला. यावेळी ८४ काेटी ६१ लाख २० हजार रुपये एवढा निधी दिला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात १७२ काेटी रुपयाचा निधी दिला आहे. राज्य शासनाने मंजूर केलेला सर्वच निधी गडचिराेली जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. या निधीचे नियाेजन करून ताे वेळेत खर्च करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमाेर आहे. काेराेनाची साथ आता ओसरत आहे. त्यामुळे जनजीवन सुरळीत हाेण्यास सुरुवात झाली आहे. काेराेनाच्या कालावधीत अर्थचक्र ठप्प पडले हाेते. मात्र लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच पुन्हा अर्थचक्र गती पकडण्यास सुरुवात झाली आहे.
बाॅक्स...
ठराविक जिल्ह्यांना निधी
डीपीसीसाठी जेवढा निधी मंजूर केला हाेता तेवढा निधी मिळणाऱ्या राज्यातील काही माेजक्या जिल्ह्यांमध्ये गडचिराेली जिल्ह्याचा समावेश आहे. मागील वर्षीचा बहुतांश निधी खर्च झाल्याने यावर्षी राज्य शासनाने पूर्ण निधी गडचिराेली जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे. यावर्षीचाही निधी वेळेत खर्च हाेईल, अशी अपेक्षा आहे.