आदर्श महाविद्यालयात संशोधन केंद्राची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:52+5:302021-05-31T04:26:52+5:30

देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात मागील ३२ वर्षांपासून कला व वाणिज्य शाखा सुरू असून १० वर्षांपासून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी व ...

Recognition of Research Center in Adarsh College | आदर्श महाविद्यालयात संशोधन केंद्राची मान्यता

आदर्श महाविद्यालयात संशोधन केंद्राची मान्यता

googlenewsNext

देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयात मागील ३२ वर्षांपासून कला व वाणिज्य शाखा सुरू असून १० वर्षांपासून समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी व वाणिज्य विषयाचे पदव्युत्तर वर्ग सुरू आहेत. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी आचार्य पदवी प्राप्त करून विद्यापीठात नावलौकिक मिळविले आहे. वाणिज्य शाखेतील व्यावसायिक अर्थशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन व प्रशासन आणि वाणिज्य तर मानव्य विज्ञान शाखेत समाजशास्त्र या विषयात संशोधनासाठी विद्यापीठाची मान्यता प्राप्त झाली.

वाणिज्य शाखेकरिता महाविद्यालयातील डॉ. एच. एम. कामडी, डॉ. जयदेव देशमुख मार्गदर्शक आणि महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील डॉ. मनोज ठवरे सहयोगी मार्गदर्शक तर समाजशास्त्र विषयासाठी डॉ. विठ्ठल चव्हाण मार्गदर्शक तर एफ ई एस कॉलेज चंद्रपूरचे डॉ. राजेंद्र बारसागडे, श्रीनिवास पिलगुलवार सहयोगी मार्गदर्शक असणार आहेत. नवसंशोधकांनी सामाजिक, आर्थिक, व्यवस्थापन व प्रशासन आणि वाणिज्यिक विषयातील विविध संशोधने पुढे आणावीत असे, आवाहन प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी केले आहे.

Web Title: Recognition of Research Center in Adarsh College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.