पेसा गावांची पुनर्रचना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:34 PM2019-02-28T23:34:52+5:302019-02-28T23:35:19+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्रसर्वेक्षण करावे, ज्या गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा देसाईगंजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्रसर्वेक्षण करावे, ज्या गावांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांची लोकसंख्या ५० टक्केपेक्षा कमी आहे, अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका शाखा देसाईगंजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना घोषित करावी, वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदांसाठी ओबीसी प्रवर्गाचे फक्त ६ टक्के असलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण कमी झाले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करावे, लोकसभा निवडणुकीपूर्वी आश्वासनांची पूर्तता करावी, अन्यथा ओबीसी समाज लोकसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरी, प्रा.शेषराव येलेकर, प्रा.दामोधर सिंगाडे, ओबीसी महासंघाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष लोकमान्य बरडे, आरमोरी अध्यक्ष जितेंद्र ठाकरे, पंकज धोटे, हिरालाल शेंडे, शंकर पारधी, दीपक प्रधान, सूरज लोथे यांच्यासह ओबीसी महासंघाचे तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते.