दोन महिन्यांतील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:35 AM2021-03-19T04:35:55+5:302021-03-19T04:35:55+5:30
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या आता १० हजार २० एवढी झाली आहे. त्यातील ९६१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर ...
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधित रुग्णांची संख्या आता १० हजार २० एवढी झाली आहे. त्यातील ९६१८ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर २९४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच एकूण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के, तर मृत्युदर १.०८ टक्के झाला आहे. गुरुवारी २७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
गुरुवारी आढळलेल्या नवीन ५४ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २३, अहेरी तालुक्यातील ७, आरमोरी ३, भामरागड १, चामोर्शी ५, धानोरा १, कोरची २, तर देसाईगंज तालुक्यातील १२ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या २७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १६, अहेरी १, आरमोरी २, चामोर्शी १, धानोरा १, कोरची १, कुरखेडा १, तर देसाईगंजमधील ४ जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील पोलीस हॉस्पिटल १, शिवाजीनगर ग्रामसेवक कॉलनी १, नवेगाव ५, स्नेहानगर १, स्थानिक १, रामपुरी वाॅर्ड कॅम्प एरिया १, साईनगर १, कर्मवीर विद्यालय अर्मिझा ३, रांगी १, रामनगर १, शिवाजी हायस्कूल पोर्ला २, आशा निकेतन चर्च वसा २, शिवाजी स्कूलच्या मागील २, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, नागेपल्ली ४, कनेपल्ली १, आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये वांखी १, वैरागड २, भामरागड तालुक्यातील स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली १, आष्टी १, स्थानिक १, वायगाव १, गणेशनगर १, कोरची तालुक्यातील स्थानिक २, कुरखेडा तालुक्यातील रामगड १, मेंढेगाम १, देसाईगंज तालुक्यातील स्थानिक १, फॉरेस्ट कॉलनी ३, किदवई वार्ड १, मोहटोला १, उसेगाव २, चप्राड १, कुरुड १, भगतसिंग वार्ड १, चिखली रिठ १ आदींचा समावेश आहे.
...तरीही राज्यात सर्वात कमी रुग्ण
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा पार केला असला तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात रुग्णसंख्या कमीच असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सर्वाधिक उशिरा कोरोनाचा गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव झाला होता. त्यानंतर आता रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यातही गडचिरोली जिल्हा आघाडीवर आहे.