आरटीओतर्फे ८८ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:22 AM2017-09-13T00:22:25+5:302017-09-13T00:22:25+5:30

उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्फत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांवर कारवाई करून ८८ लाख ३० हजार रूपयांचा महसूल गोळा केला आहे.

Recovery of 88 lakhs by RTO | आरटीओतर्फे ८८ लाखांची वसुली

आरटीओतर्फे ८८ लाखांची वसुली

Next
ठळक मुद्देपाच महिन्यांतील स्थिती : दुसºया राज्यातील वाहनांकडून सर्वाधिक कर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्फत एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत वाहनांवर कारवाई करून ८८ लाख ३० हजार रूपयांचा महसूल गोळा केला आहे.
अवैैध वाहतूक करणाºया वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. या विभागाला दर वर्षी शासनाच्या मार्फत महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनाकडून दिले जाते. गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला दर महिन्याला जवळपास १८ लाख महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी, दुचाकी व माल वाहतूक वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्याला मासिक उद्दिष्टही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा तेलंगणा, छत्तीसगड राज्याला लागून आहेत. या जिल्ह्यातून तेलंगणा, छत्तीसगड राज्यासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश राज्यातूनही वाहने येतात. या वाहनांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत तडजोड शुल्क व विभागीय कारवाईच्या माध्यमातून राज्यातील वाहनांकडून २२ लाख ९२ हजार रूपयांचा महसूूल गोळा केला आहे. तर इतर राज्यातील वाहनांकडून ५१ लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. राज्यातील वाहनधारकांकडून ९ लाख २७ हजार रूपयांचा चालू कर व ४ लाख १७ हजार रूपये एवढा थकीत कर वसूल केला आहे. इतर राज्यातील वाहनधारकांकडून चालू कराच्या माध्यमातून ९४ हजार रूपये कर गोळा केला आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाला पाच महिन्यांत ८८ लाख ३० हजार रूपये महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिले होते. या विभागाने या कालावधीत उद्दिष्टाएवढाच म्हणजे ८८ लाख ३० हजार रूपयांचा महसूल गोळा केला आहे. दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत चालली आहे. नोंदणी करतेवेळी प्रत्येक वाहनावर शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर वाहनमालक वाहनपरवाना काढत असल्याने वाहनपरवान्याच्या माध्यमातूनही लाखो रूपयांचा महसूल आरटीओ विभागाकडे गोळा होतो. गडचिरोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दरवर्षी दिलेले उद्दिष्ट गाठते.
१४ ते ३१ आॅगस्टदरम्यान मोहीम
१४ ते ३१ आॅगस्टदरम्यान परिवहन विभागाने विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याअंतर्गतचे पथक बदलविण्यात आले होते. एका जिल्ह्यातील पथकाला दुसºया जिल्ह्यात पाठविले होते. यादरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनांवर कारवाई करून महसूल गोळा करण्यात आला. १ आॅगस्ट ते १३ आॅगस्ट या कालावधीत गडचिरोली आॅफिस कॉडने १३ दिवसांच्या कालावधीत १२ लाख रूपयांचा महसूल गोळा केला आहे.
 

Web Title: Recovery of 88 lakhs by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.