१०० खाटांच्या महिला रूग्णालयात १५० रुग्णांची भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:49 AM2021-02-27T04:49:11+5:302021-02-27T04:49:11+5:30
प्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी या रूग्णालयाला भेट दिली असता हे वास्तव उजेडात आले. या रूग्णालयात १०० खाटा मंजूर आहेत. यापैकी ...
प्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी या रूग्णालयाला भेट दिली असता हे वास्तव उजेडात आले. या रूग्णालयात १०० खाटा मंजूर आहेत. यापैकी ६० खाटा महिला रूग्णांसाठी तर ४० खाटा बाल रूग्णांसाठी वापरल्या जातात. खाटांची (बेड) कमतरता सोडल्यास या रूग्णालयात इतर सुविधांचा फारसा अभाव नसल्याचे येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
या रूग्णालयात स्वच्छता बऱ्यापैकी दिसून आली. नातेवाईकांसाठीही रूग्णालयाच्या परिसरात दाेन ते तीन ठिकाणी शेड तयार करण्यात आल्याने त्यांची हेळसांड काहीशी थांबली आहे.
बाॅक्स .......
४० वर महिलांना खाटा नाही
१०० खाटांपैकी ४० खाटा बाल रूग्णांसाठी ठेवल्या जातात. सद्यस्थितीत या रूग्णालयात सर्व मिळून १५० रूग्ण दाखल आहेत. यापैकी ३० बालरूग्ण असून १३० महिला रूग्ण आहेत. जाेखमीच्या नसलेल्या गर्भवती मातांना गादीवर झाेपून औषधाेपचार घ्यावा लागताे.
काेट....
शासनाच्या वतीने या महिला व बाल रूग्णालयात वाढीव १०० बेडला मंजुरी देण्यात आली आहे. रूग्णालयालगतची महसूल विभागाची जागासुद्धा मिळाली आहे. इमारत बांधकामासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू आहे. निविदा काढणे बाकी आहे. रूग्णांना परिपूर्ण सेवा देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असताे.
- डाॅ.दीपचंद साेयाम, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रूग्णालय, गडचिराेली
काेट .....
सकाळी व सायंकाळला डाॅक्टरांचा दाेन वेळा राऊंड हाेताे. तपासणी करून औषधी लिहून दिली जाते. येथे काही महिला रूग्णांना खाटा मिळत नाही. पुरेशा खाटांची व्यवस्था व्हावी.
- शकुंतला किरंगे, रूग्ण नातेवाईक
बाॅक्स .....
या कारणांमुळे गर्भवती महिला हाेतात रेफर
गर्भजल कमी असणे, कमी वजनाचे, कमी दिवसाचे बाळ असणे, ब्लिडिंग हाेणे, बाळाच्या गळ्याभाेवती नाळ असणे, बाळ पायाळू असणे अशी स्थिती असल्यास संबंधित गर्भवती महिलांची सिझर प्रसुती करावी लागते. उपजिल्हा रूग्णालयात सिझर प्रसुतीसाठी व्यवस्था असली तरी तेथे वेळेवर तज्ज्ञ डाॅक्टर राहात नाही. अतिजाेखमीच्या गर्भवती महिलांच्या प्रसुतीसाठी वेळेवर रक्त उपलब्ध असणे गरजेचे असते. हृदयराेगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, स्त्री व बालराेगतज्ज्ञ तसेच इतर तज्ज्ञ डाॅक्टरांची चमू उपस्थित असणे गरजेचे आहे. तालुकास्तरावर ही सुविधा राहात नसल्याने अतिजाेखमींच्या गर्भवती महिला प्रामुख्याने या महिला रूग्णालयात प्रसुतीसाठी वेळेवर आणल्या जातात. येथील वैद्यकीय चमू शर्थीचे प्रयत्न करून प्रसुती करतात.