ओबीसींच्या मागण्या मान्य होईपर्यंत पदभरती करण्यात येऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:54+5:302021-02-24T04:37:54+5:30
याबाबतचे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे ...
याबाबतचे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे समाजहित लक्षात घेऊन सदर मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. असे असले तरी जोपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पुर्ववत १९ टक्के होणार नाही तोपर्यंत ओबीसींचा न्याय हक्कासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याने तुर्तास कोणतीही शासकीय पदभरती करण्यात येऊ नये,अन्यथा या विरोधात ओबीसींच्या वतीने कोरोना उद्रेकाला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असुन त्या वेळेस होणा-या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल, असे नमुद करण्यात आले आहे. निवेदन निवासी उप जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी स्विकारले .यावेळी ओबीसी समाजाचे लोकमान्य बरडे,पंकज धोटे,रमाकांत ठेंगरे,मुरलीधर सुंदरकर, प्रा. दामोदर सिंगाडे, सागर वाढई, राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, महेश पिलारे, हिरालाल शेंडे, वसंता दोनाडकर, ज्ञानदेव पिलारे, विष्णु दुनेदार,धनपाल मिसार, दिनेश बेदरे, दिलीप नाकाडे, प्रदिप तुपट आदी उपस्थित होते.