ओबीसींच्या मागण्या मान्य होईपर्यंत पदभरती करण्यात येऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:47 AM2021-02-25T04:47:56+5:302021-02-25T04:47:56+5:30

याबाबतचे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे ...

Recruitment should not be done till the demands of OBCs are met | ओबीसींच्या मागण्या मान्य होईपर्यंत पदभरती करण्यात येऊ नये

ओबीसींच्या मागण्या मान्य होईपर्यंत पदभरती करण्यात येऊ नये

googlenewsNext

याबाबतचे निवेदन ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाचा उद्रेक वाढल्यामुळे समाजहित लक्षात घेऊन सदर मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. असे असले तरी जोपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के होणार नाही, तोपर्यंत ओबीसींचा न्याय्य हक्कांसाठीचा लढा सुरूच राहणार असल्याने तूर्तास कोणतीही शासकीय पदभरती करण्यात येऊ नये. अन्यथा, याविरोधात ओबीसींच्या वतीने कोरोना उद्रेकाला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार असून त्या वेळेस होणा-या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल, असे नमूद करण्यात आले आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी स्वीकारले. यावेळी ओबीसी समाजाचे लोकमान्य बरडे, पंकज धोटे, रमाकांत ठेंगरे, मुरलीधर सुंदरकर, प्रा. दामोदर सिंगाडे, सागर वाढई, राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत, महेश पिलारे, हिरालाल शेंडे, वसंता दोनाडकर, ज्ञानदेव पिलारे, विष्णू दुनेदार, धनपाल मिसार, दिनेश बेदरे, दिलीप नाकाडे, प्रदीप तुपट आदी उपस्थित होते.

Web Title: Recruitment should not be done till the demands of OBCs are met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.