लालपरी असुरक्षित, आपत्कालीन दरवाजे वेल्डिंगने लाॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:36+5:302021-03-05T04:36:36+5:30

बाॅक्स ... निम्म्या बसमध्ये अग्निशमन बस नाही एसटी हे प्रवाशी वाहन आहे. बसमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्र ...

Red unprotected, emergency doors locked by welding | लालपरी असुरक्षित, आपत्कालीन दरवाजे वेल्डिंगने लाॅक

लालपरी असुरक्षित, आपत्कालीन दरवाजे वेल्डिंगने लाॅक

Next

बाॅक्स ...

निम्म्या बसमध्ये अग्निशमन बस नाही

एसटी हे प्रवाशी वाहन आहे. बसमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्र असणे आवश्यक आहे. मात्र, गडचिराेली आगारातील जवळपास निम्म्या बसमध्ये अग्निशमन यंत्रच नाही. शासनाचे नियम पायदळी तुडवत एसटी चालविली जात आहे.

बाॅक्स ....

प्रथमाेपचार पेट्या गायब

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर प्राथमिक स्वरूपाचा उपचार करता यावा, यासाठी प्रत्येक बसमध्ये प्रथमाेपचार पेट्या असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बसमधील या पेट्याच गायब आहेत, तर ज्या बसमध्ये पेट्या आहेत त्यामध्ये साहित्य नसल्याचे दिसून आले.

बाॅक्स .....

वाय-फाय सुविधा नावालाच

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चार वर्षांपूर्वी एसटीने वाय-फाय सुविधा सुरू केली हाेती. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या माेबाइलवर गाणी ऐकता येत हाेती. मात्र, यातील अर्धेअधिक वाय-फाय यंत्र बंद पडले आहेत,तर काही बसमध्ये हे यंत्रच उपलब्ध नाही.

बाॅक्स ...

बसस्थानकावर दुचाकी वाहने

गडचिराेलीच्या बसस्थानकात पुरेशी जागा उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या भागात वाहने ठेवता येतात. मात्र, प्रवाशी थेट बसस्थानकापर्यंत वाहने नेतात. यासाठी काेणीही अटकाव करीत नाही. बसस्थानकाच्या समाेरच्या भागात प्रवाशी व बसची वर्दळ राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स .....

चालकाच्या कॅबिनची दुरवस्था

चालक हा बसचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चालकाला बसमध्ये बसल्यावर साेयीचे वाटणे आवश्यक आहे. मात्र, बसच्या कॅबिनची अत्यंत दुरवस्था झाली आहे. अनेक स्विच तुटले आहेत. एकमेकांना वायर जाेडून काम चालविले जात आहे. बहुतांश बसच्या हाॅर्नचे बटन तुटलेले आहेत. वायर स्पार्किंग करून हाॅर्न वाजविली जात असल्याची माहिती चालकांनी दिली.

काेट ......

बहुतांश बसचे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत आहेत. एखाद्या बसचा दरवाजा वेल्डिंग करून लाॅक असेल तर ताे तत्काळ दुरुस्त केला जाईल. जवळपास ६० टक्के बसमध्ये अग्निशमन यंत्र उपलब्ध आहे. काही यंत्रांची मागणी करण्यात आली आहे.

- मंगेश पांडे, आगारप्रमुख, गडचिराेली

Web Title: Red unprotected, emergency doors locked by welding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.