रेफरमुळे महिला व बाल रुग्णालयावरील भार वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:36+5:302021-02-05T08:55:36+5:30

एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीत ५ हजार २४९ गराेदर महिला भरती झाल्या. यामध्ये ३ हजार १५६ ...

The referral increased the burden on the women and children's hospital | रेफरमुळे महिला व बाल रुग्णालयावरील भार वाढला

रेफरमुळे महिला व बाल रुग्णालयावरील भार वाढला

Next

एप्रिल ते डिसेंबर २०२० या नऊ महिन्यांच्या कालावधीत ५ हजार २४९ गराेदर महिला भरती झाल्या. यामध्ये ३ हजार १५६ गराेदर महिला विविध रुग्णालयांमधून जिल्हा महिला रुग्णालयात भरती करण्यात आल्या आहेत. एकूण भरती झालेल्या गराेदर महिलांमध्ये हे प्रमाणे ६०.१२ टक्के एवढे आहे. गराेदर महिलांची प्रसूती हा दाेन जिवांचा प्रश्न आहे. त्यामुळे काेणत्याही ठिकाणी ती प्रसूती झाली तरी काहीच हरकत नाही. मात्र कधीकधी प्रवासादरम्यान माता किंवा बाळ दगावण्याची शक्यता असते. गडचिराेली जिल्ह्याचा उत्तर-दक्षिण विस्तार अधिक आहे. १०० ते१५० किमी अंतरावरून गराेदर महिलेला आणले जाते. यावेळी त्यांच्या जिवाला धाेका हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याची गरज आहे.

बाॅक्स ...

३५८महिला चंद्रपूरला रेफर

चंद्रपूर येथे मेडिकल काॅलेज आहे. या काॅलेजमध्ये जिल्हा महिला व बाल रुग्णालयापेक्षा अधिकच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अधिकची गुंतागुंत असलेल्या महिलांना चंद्रपूर येथे भरती केले जाते. नऊ महिन्यांच्या कालावधीत ३५८ महिलांना रेफर करण्यात आले आहे. यावरून दरदिवशी सरासरी एक किंवा दाेन महिलांना भरती केले जाते.

बाॅक्स .....

या मातांना केले जाते रेफर

प्रसूतीच्या कालावधीदरम्यान ६ टक्केपेक्षा कमी हिमाेग्लाेबीन असलेल्या माता, हायपरटेन्शन, अतिजाेखमीच्या गरोदर महिला, रक्तस्त्राव हाेत असल्यास, जुळे किंवा बाळाला व्यंगत्व असल्यास, हृदयराेग, टीबीने ग्रस्त माता, गर्भाशय खाली येणे, डायबेटीज, मातेचे कमी वजन, कमी दिवस असणे, जंतुसंसर्ग, मातेचे जास्त वय असणे, खूप दिवसांनी गर्भधारणा हाेणे, सिकलसेल, थॅलॅसेमिया आदींनी ग्रस्त महिलांना शक्यताे जिल्हा महिलांना रुग्णालयात भरती केले जाते.

काेट ....

गराेदर महिलेची प्रसूती करणे हा दाेन जिवांचा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी सुविधा आहेत त्याच ठिकाणी गराेदर महिलेला भरती करणे उचित आहे. त्यामुळे माता व बालमृत्यूची शक्यता टाळता येते. ज्या ठिकाणी स्पेशालिस्ट आहेत त्याच ठिकाणी प्रसूती करून घेणे चांगले राहाते. रुग्ण वाढल्याने डाॅक्टर व आराेग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचा व्याप जरी वाढला असला तरी सुखरूप प्रसूती हाेते. यामुळे आराेग्य कर्मचारी व डाॅक्टरांना समाधान मिळते.

- डाॅ. दीपचंद साेयाम, अधीक्षक, महिला व बालरुग्णालय, गडचिराेली

बाॅक्स ......

रेफर हाेऊन आलेल्या मातांचे प्रमाण

महिना रेफर माता एकूण

एप्रिल ३२७ ५६३

मे ३३५ ५४९

जून ३६३ ५३५

जुलै ३१५ ५००

ऑगस्ट ४१२ ६१८

सप्टेंबर ३७४ ५९२

ऑक्टाेबर २२५ ६३०

नाेव्हेंबर ४०१ ६३४

डिसेंबर ४०४ ५९८

एकूण ३,१५६ ५,२४९

Web Title: The referral increased the burden on the women and children's hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.