परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:31 AM2021-02-08T04:31:55+5:302021-02-08T04:31:55+5:30
गडचिराेली : काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाची सेमीस्टर परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी गाेंडवाना यंग ...
गडचिराेली : काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाची सेमीस्टर परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यात यावे, अशी मागणी गाेंडवाना यंग टीचर असाेसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ अनुदान आयोग व उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठाने सेमीस्टर २ व ४ च्या वर्गांमध्ये बढती दिली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गांमध्ये बढती दिलेली आहे; परंतु संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरून त्यासंदर्भातील आवश्यक शुल्क विद्यापीठाला जमा केलेले आहे. विद्यापीठाने परीक्षा न घेतल्यामुळे परीक्षासंदर्भातील खर्चाची बचत झालेली आहे, तसेच या काळात उद्योगधंदे व व्यवसाय बंद असल्याने पालकांची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावलेली आहे. अशास्थितीत परीक्षा न घेता विद्यार्थ्यांकडून शुल्क घेणे हे विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर अतिरिक्त भार टाकण्याचा प्रकार आहे. ते योग्य नाही. करिता संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा फी विद्यापीठाने परत करावी, तसे शक्य नसल्यास पुढील परीक्षेमध्ये ती समायोजित करावी, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश तात्काळ दिले. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, सचिव प्राध्यापक विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ. सुनील नरांजे, डॉ. विजय वाढई, डॉ. राजू किरमिरे, सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने, कोषाध्यक्ष डॉ. जनार्दन काकडे, महिला आघाडीप्रमुख डॉ. लता सावरकर, सोशल मीडियाप्रमुख डॉ. रूपेश कोल्हे, डॉ. अभय लाकडे, डॉ. किशोर कुडे, डॉ. राजेंद्र गोरे, डॉ. गणेश चौधरी, डॉ. संजय फुलझेले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.