उन्हाळी धान व मका विक्रीसाठी ३० पर्यंत नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:37 AM2021-04-27T04:37:25+5:302021-04-27T04:37:25+5:30
उन्हाळी धान उत्पादक शेेतकऱ्यांनी ‘रब्बी धान’ असा उल्लेख असलेला ७/१२, नमुना-८, आधार कार्ड तसेच बँकेचे खाते क्रमांक दिसणारे पहिले ...
उन्हाळी धान उत्पादक शेेतकऱ्यांनी ‘रब्बी धान’ असा उल्लेख असलेला ७/१२, नमुना-८, आधार कार्ड तसेच बँकेचे खाते क्रमांक दिसणारे पहिले पृष्ठ आदींच्या छायांकित प्रती व माेबाइल क्रमांकासह व्हाॅट्सॲपवर पाठवावे. तसेच मका पिकाकरिता ‘रब्बी मका’ असा उल्लेख असलेला ७/१२, नमुना-८ अ, आधारकार्ड तसेच बँकेचे खाते क्रमांक दिसणारे पहिले पृष्ठ आदींच्या छायांकित प्रती व माेबाइल क्रमांकासह व्हाॅट्सॲपवर पाठवावे. काेराेनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने काेणत्याही शेतकऱ्यांनी कार्यालयात येऊ नये. खरीप हंगामातील धानाने गाेदाम भरले असल्याने तहसीलदारांनी मका खरेदीकरिता शासकीय गाेदाम किंवा इतर गाेदाम उपलब्ध करून दिल्यानंतरच खरेदी सुरू करता येईल, शेतकऱ्यांनी याची नाेंद घ्यावी. चामाेर्शी तालुक्याकरिता ९३५६६२३५७६, ९४२१९५७५४४, ९४२३५६१८३९, ९४२३०२९४९०, मुलचेरा तालुक्यासाठी ९४२२९३८६३५, ९४२०६९३६९५, ८२७५८७१४३३ तर गडचिराेली तालुक्यासाठी ९४२१९६५०१६, ९४०५११८४८० या क्रमांकावर शेतकऱ्यांनी ३० एप्रिलपूर्वी व्हाॅट्सॲपवर नाेंदणी करावी. उन्हाळी धान व मका खरेदी सुरू झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मेसेजद्वारे किंवा फाेनद्वारे माल विक्रीसाठी आणण्यासंदर्भात कळविले जाईल, असे चामाेर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी तसेच प्रभारी व्यवस्थापक राकेश पाेरटे यांनी कळविले आहे.